WC 2023: देसी जुगाड! Ind vs Pak सामन्यासाठी हॉटेल्स महाग झाले तर थेट हॉस्पिटलमध्ये बेडच केले बुक...

ind vs pak Fans book hospital beds
ind vs pak Fans book hospital bedssakal

India vs Pakistan WC 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. स्टेडियमची क्षमता 1 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळेच या सामन्याला चाहते मोठ्या संख्येने पोहोचण्याची शक्यता आहे.

ind vs pak Fans book hospital beds
Cricket League: भारतात क्रिकेटच्या खेळपट्टीवरही जात-धर्म! सुरू झाली नवी कास्ट क्रिकेट लीग, गंभीरने केले उद्घाटन

वेळापत्रक जाहीर होताच अहमदाबादमधील हॉटेल रूमच्या किमती गगनाला भिडल्या आहेत आणि जवळपास बुक झाली आहेत. आता चाहत्यांनी देसी जुगाड बनवला आहे. हा सामना पाहण्यासाठी त्याने हॉटेलऐवजी हॉस्पिटलचे बुकिंग सुरू केले आहे. विश्वचषक स्पर्धेचे सामने 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहेत. 46 दिवस चालणाऱ्या आयसीसी स्पर्धेत 10 संघ सहभागी होत असून एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत.

ind vs pak Fans book hospital beds
Sl vs Pak Babar Azam: गजब बेइज्जती! श्रीलंकेने बाबरचा केला पोपट, आधी केला अपमान अन् नंतर...

अहमदाबाद मिररच्या बातमीनुसार, अहमदाबादमध्ये हॉटेलचे एका दिवसाचे भाडे जवळपास 50 हजारांवर पोहोचले आहे. त्याच वेळी रुग्णालयात एक-दोन मुक्कामासाठी त्यांना 3 हजार ते 25 हजार इतकाच खर्च करावा लागतो, जे हॉटेलच्या भाड्यापेक्षा सुमारे 25 हजार रुपयांनी कमी आहे.

एका खाजगी रुग्णालयाचे संचालक डॉ. पसार शाह यांनी सांगितले की, "हे हॉस्पिटल असल्याने, ते संपूर्ण संपूर्ण बॉडी चेकअप आणि रात्रभर मुक्काम करण्याची मागणी करत आहेत, जेणेकरून ते रात्रीचा मुक्काम सोबत त्यांच्या शरीराची तपासणीही होईल आणि पैशांचीही बचत होईल.

ind vs pak Fans book hospital beds
Wi vs Ind: टीम इंडियाचा डाव स्वत:वर उलटला! तिसऱ्या क्रमांकावर गिल फेल, आता कोण आहे दावेदार?

इतर शहरांमध्येही अशीच परिस्थिती

दुसरीकडे, दुसरे डॉक्टर निखिल लाल यांनी सांगितले की, 15 ऑक्टोबरच्या सुमारास आमच्या हॉस्पिटलमध्ये 24 ते 48 तास राहण्यासाठी बरीच चौकशी केली जात आहे, कारण आमच्याकडे बॉडी चेकअपचे पॅकेज आहे. याचे कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आगामी सामना. इतर शहरांमध्येही हीच परिस्थिती आहे. विश्वचषकापूर्वी आशिया चषकातही भारत आणि पाकिस्तान यांच्यात 3 सामना होण्याची शक्यता आहे. वनडे फॉरमॅटचे हे सामने श्रीलंकेत खेळवले जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com