Ind vs Pak Test Series: भारत-पाक यांच्यात होणार कसोटी मालिका? 'या' देशाने दिली ऑफर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs Pakistan Test Series :

Ind vs Pak Test Series: भारत-पाक यांच्यात होणार कसोटी मालिका? 'या' देशाने दिली ऑफर

India vs Pakistan Test Series : यंदाच्या टी-20 विश्वचषकादरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यातील यश पाहून मेलबर्न क्रिकेट क्लबला या दोन देशांमधील कसोटी सामन्याचे आयोजन करायचे आहे. MCG चे व्यवस्थापन करणाऱ्या MCC आणि व्हिक्टोरियन सरकारने अलीकडेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामन्याचे आयोजन करण्याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी चर्चा केली आहे.

एमसीसीचे मुख्य कार्यकारी स्टुअर्ट फॉक्स यांनी ऑक्टोबरमध्ये येथे खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक सामन्यातील शानदार यशानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी सामना आयोजित करण्यात मत व्यक्त केले आहे. या दोन देशांदरम्यान खेळल्या गेलेल्या या सामन्यात 90 हजारांहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते.

हेही वाचा: Team India: टी-20 मधून विराट-रोहितसह 'या' 6 खेळाडूंची कारकीर्द संपली! टीम इंडियात आता 'नो एंट्री'

MCC चे मुख्य कार्यकारी स्टुअर्ट फॉक्सने सेन रेडिओला सांगितले की, “एमसीजीमध्ये सलग तीन कसोटी सामने खेळणे निश्चितच चांगले होईल. स्टेडियम प्रत्येक वेळी खचाखच भरले जाईल. याबाबत आम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी बोललो आहोत. मला माहित आहे की व्यस्त वेळापत्रकात हे खूप क्लिष्ट आहे पण मला विश्वास आहे की कदाचित हे एक मोठे आव्हान पार होईल.

हेही वाचा: IND vs SL: सब्सक्रिप्शन संपलयं?, भारत-श्रीलंका सामना 'येथे' पाहू शकता फुकटात

फॉक्स म्हणाले की, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी बोलले पाहिजे. स्टुअर्ट फॉक्सच्या म्हणण्यानुसार, 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया याबाबत आयसीसीशी बोलणे सुरूच ठेवेल आणि त्यासाठी आग्रही राहील अशी अपेक्षा आहे. जेव्हा तुम्हाला जगभरातील अनेक स्टेडियम रिकामे दिसतात, तेव्हा मला वाटते की खचाखच भरलेले स्टेडियम आणि तेथील वातावरण खेळासाठी चांगले असेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय कसोटी मालिका शेवटची 2007 मध्ये खेळली गेली होती. यानंतर त्यांचा सामना फक्त आयसीसी किंवा आशियाई क्रिकेट परिषद स्पर्धेत झाला आहे.