SA vs IND T20 : गिलच्या पुनरागमनामुळे कर्णधार सूर्याची वाढली डोकेदुखी! पहिला टी-20 सामन्यातून कोण जाणार बाहेर?

परदेशातील अग्निपरीक्षा आजपासून! भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला ट्वेन्टी-२० सामना
SA vs IND T20
SA vs IND T20

SA vs IND T20 : टी-२० प्रकारात मायदेशात वर्चस्व गाजवणाऱ्या भारताच्या नवोदितांची अग्निपरिक्षा आजपासून सुरू होत आहे. वेगवान तसेच चेंडूंना अधिक उसळी असणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज कसा खेळ करतात, यावर त्यांचे पुढचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

कसलेले आणि अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह जसप्रीत बुमराची विश्रांती, दुखापतीमुळे हार्दिक पंड्याची अनुपस्थिती अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची आजपासून दक्षिण आफ्रीकेविरुद्ध ट्वेन्टी-२० मालिका सुरु होत आहे.

आयपीएल गाजवल्यामुळे ज्या नवोदितांना भारताच्या टी-२० संघाचे दरवाजे उघडण्यात आले त्या सर्वांनी भारतात आपली क्षमता सिद्ध केली आहे, परंतु आता तुलनेने आव्हानात्मक असलेल्या परिस्थितीत त्यांना स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे.

सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या भारतीय संघाने काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाला मायदेशात ४-१ अशी धुळ चारली. आता तुलनेने ऑस्ट्रेलियाएवढा बलाढ्य संघ आफ्रिकेचे नसला तरी खेळपट्यांचे आव्हान भारतीय फलंदाजांना असणार आहे. वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होत असलेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी ही अखेरची खऱ्या अर्थाने महत्वाची मालिका असणार आहे. यानंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. पण खरी परिक्षा या आफ्रिकेविरुद्ध मालिकेतच होणार आहे.

आफ्रिकेनेही खेळाडूंवरील सततच्या सामन्यांचा ताण कमी करण्यासाठी कागिसो रबाडा आणि एन्रिच नॉर्किया या प्रमुख वेगवान गोलंदाजांना विश्रांती दिली आहे तर लुंगी एन्गिडी दुखापतीमुळे खेळणार नाही तरीही त्यांच्याऐवजी खेळणाऱ्या इतर आफ्रिकन गोलंदाजांचा सामना करणे सोपे असणार नाही.

संघ निवडीची डोकेदुखी

मायदेशातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत वर्चस्व राखत असल्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाने सर्व राखीव खेळाडूंना संधी दिली होती. आता शुभमन गिल संघात परतल्यामुळे तसेच इशान किशनही शर्यतीत असल्यामुळे सलामीची जोडी निवडणे डोकेदुखी असणार आहे. फॉर्मात असलेला यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांचा प्राधान्याने विचार करावा लागणार आहे. त्यानंतर सूर्यकुमार, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा आणि रिंकू सिंग अशी क्रमवारी असू शकेल. यष्टीरक्षक म्हणून जितश शर्मा की इशान किशन या प्रश्न संघ व्यवस्थापनाला सोडवावा लागणार आहे.

मोहम्मद सिराजची निवड झाल्यामुळे भारताच्या वेगवान गोलंदाजीची धार वाढली आहे. त्याच्यासाथीला मुकेश कुमार, अर्शदीपसिंग असे गोलंदाज असले तरी आफ्रिकेकडे क्विन्टॉन डिकॉक, हेन्रिच क्लासेन डेव्हिड मिलर, एडन मार्करम असे अनुभवी फलंदाज आहेत.

रवी बिश्नोईचा कस

ऑस्ट्रेलियविरुद्धच्या मालिकेनंतर टी-२० मधील गोलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेणाऱ्या रवी बिश्नोईचा कस आता आफ्रिकेतील खेळपट्ट्यांवर असणार आहे. मुळात भारताने उद्याच्या सामन्यात दोन फिरकी गोलंदाज खेळवण्याचा विचार केला तरच त्याला अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळेल, उपकर्णधार आणि अधिक अनुभव असल्यामुळे रवींद्र जडेजाचे स्थान निश्चित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com