Ind vs Sa : छतातून पाणी आलं कसं? पावसानं BCCI ची केली पोलखोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs sa fans brutally troll bcci video leaking roof

छतातून पाणी आलं कसं? पावसानं BCCI ची केली पोलखोल

बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा आणि शेवटचा T20I सामना खेळल्या गेला. पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही आणि दोन्ही संघांमधील मालिका 2-2 अशी बरोबरीत राहिली आहे. कालच्या झालेल्या सामन्यादरम्यान अनेकवेळा पावसाने अधून मधून हजेरी लावले. त्यामुळे केवळ 3.3 षटकाचा सामना खेळला गेला. खेळ थांबला तेव्हा भारताच्या दोन गडी बाद 28 धावा झाल्या होत्या. यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला आणि नंतर सामना रद्द करण्यात आला.

हेही वाचा: Ind Vs Eng: रोहित शर्मासोबत कोण करणार ओपनिंग, BCCI ने केला खुलासा...

सततच्या पावसामुळे चाहतेही निराश झाले. पावसाने केवळ सामनाच वाहून गेला नाही तर सामन्यादरम्यान बीसीसीआय आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचा पर्दाफाश झाला आहे. रविवारच्या सामन्यादरम्यान बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस झाला, त्याचवेळी चिन्नास्वामी स्टेडियमच्या छतावरून पाणी गळत होते. चाहते आता याबद्दल सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत आणि यासाठी KSCA च्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. एका चाहत्याने स्टेडियमच्या छतावरून पाणी गळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. फॅनने हा व्हिडीओ बीसीसीआय आणि केएससीएला टॅग केला आहे. स्टेडियमच्या सुधारणार कधी हे देखील विचारले आहे.

हेही वाचा: Ind vs Sa: पाऊस पडला मॅच रद्द, तिकिटाचे पैसे मिळणार पण किती?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 9 जूनपासून सुरू झालेली पाच सामन्यांची टी-20 मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली. या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना पावसामुळे वाया गेला आणि त्यामुळे या मालिकेतील विजेत्या संघाची घोषणा होऊ शकली नाही. त्यानंतर बर्मिंगहॅममध्ये 1 जुलैला भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळायला गेला आहे. या मालिकेत भारतीय संघ इंग्लंडपेक्षा 2-1 ने पुढे आहे. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर कसोटी सामन्याव्यतिरिक्त 3 टी-20 आणि 2 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.

Web Title: Ind Vs Sa Fans Brutally Troll Bcci Video Leaking Roof Chinnaswamy Stadium Goes Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top