संजू सॅमसनच्या ऐवजी राहुल त्रिपाठीला मिळणार संधी; 'हे' कारण आलं समोर | IND vs SL 2nd T20 Playing 11 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs SL 2nd T20 Playing 11 Sanju Samson Rahul Tripathi

IND vs SL 2nd T20 Playing 11 : संजू सॅमसनच्या ऐवजी राहुल त्रिपाठीला मिळणार संधी; 'हे' कारण आलं समोर

IND vs SL 2nd T20 Playing 11 : भारताने श्रीलंकेविरूद्धचा पहिला टी 20 सामना अवघ्या 2 धावांनी जिंकत मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना पुण्यात 5 जानेवारीला होणार आहे. जरी भारताने पहिला सामना जिंकला असला तरी या विनिंग कॉम्बिनेशनमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Rishabh Pant : ऋषभ पंतबाबत दिल्ली कॅपिटल्स मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; बीसीसीआय सोबत...

पहिल्या सामन्यात भारताने फलंदाजीत फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. मधल्या फळीतील फलंदाज संजू सॅमसन स्वस्तात माघारी गेली होता. मात्र संजू सॅमसनला एका खराब खेळीमुळे बेंचवर बसवण्याची शक्यता नाही. तर संजू सॅमसनला सामन्यादरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती. त्याचा गुडघा सुजला आहे. त्यामुळे त्याच्या गुडघ्याचे स्कॅन करण्यात येणार आहे. त्याच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात प्लेईंग 11 मधील समावेशाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

जर संजू सॅमसन दुसरा सामना खेळू शकला नाही तर अशा परिस्थिती पुण्याचा लोकल बॉय राहुल त्रिपाठीला प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. राहुल त्रिपाठीने पदार्पण केल्यापासून गेले 13 सामने बेंचवरच बसून आहे. राहुल त्रिपाठीसाठी फलंदाजीचा चौथा क्रमांक अगदी योग्य आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा: Ranji Trophy : मुंबईला कोणी वाली आहे की नाही; सर्फराजनं अजून किती शतकं ठोकायची?

राहुल त्रिपाठी या मालिकेत होता संघासोबत

भारत विरूद्ध आयर्लंड टी 20 (2 सामने)

भारत विरूद्ध झिम्बाब्वे वनडे (3 सामने)

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (3 सामने)

भारत विरूद्ध बांगलादेश (3 सामने)

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट