आमची भूमी आमचा जलवा! टीम इंडियाची विजयी मालिका कायम

India vs Sri Lanka, 2nd T20I
India vs Sri Lanka, 2nd T20I Sakal

India vs Sri Lanka, 2nd T20I : रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने मालिका विजयाचा धडाका कायम ठेवला आहे. न्यूझीलंड, वेस्ट इंडीज संघाला एकहाती धूळ चारणाऱ्या टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धची मालिकाही खिशात घातली. धर्मशाला मैदानात रंगलेल्या दुसऱ्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना श्रीलंका संघाने निर्धारित 20 षटकात 5 बाद 183 धावा करत टीम इंडियासमोर 184 धावांचे लक्ष्य ठेवलं होते. हे आव्हान 7 विकेट्स आणि 17 चेंडू राखून पार करत भारतीय संघाने दिमाखदार विजयाची नोंद केली. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली.

श्रीलंकेनं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा आणि ईशान किशन स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) सामन्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. संजू सॅमसनने (Sanju Samson) त्याला सुरेख साथ दिली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी रचत सामना भारताच्या बाजूनं वळवला. संजू सॅमसन 25 चेंडूत 39 धावा करुन बाद झाला. त्याने आपल्या या खेळीत 2 चौकार आणि 3 षटकार खेचले. श्रेयस अय्यर आणि रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja) जोडीन भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दुसरा सामना 7 विकेट्स आणि 17 चेंडू राखून जिंकत टीम इंडियाने मालिकाही खिशात घातली.

India vs Sri Lanka, 2nd T20I
VIDEO : धुलाईचा बदला; जाडेजाला मिळाली व्यंकटेशची साथ!

पहिल्या सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी करणाऱ्या श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) दुसऱ्या सामन्यातही नाबाद अर्धशतक झळकावले. विशेष म्हणजे तो संघाला विजय मिळवून देत नाबाद परतला. त्याने 44 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने 74 धावा केल्या. दुसऱ्या बाजूला रविंद्र जाडेजानेही (Ravindra Jadeja) तुफान फटकेबाजी केली. त्याने 18 चेंडूत 7 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 45 धावांची खेळी केली.

India vs Sri Lanka, 2nd T20I
IND vs SL 2nd T20I : सामन्यात काय घडलं; लंकेचं गणित कुणी बिघडलं!

रोहित शर्माने भारतीय संघाच्या नेतृत्वाची पूर्णवेळ धूरा हाती घेतल्यापासून भारतीय संघान पराभव पाहिलेला नाही. न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 3-0 असा विजयी धमाका केला होता. त्यानंतर आता श्रीलंकेलाही टीम इंडियाने व्हाईट वॉशच्या उंबरठ्यावर आणले आहे. रोहित पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतरचा टीम इंडियाचा हा सलग 8 वा विजय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com