IND vs SL: टीम इंडियाचा 'हा' खेळाडू 48 तासात व्हिलन वरून बनला हिरो! शेवटच्या सामन्यात केला कहर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs Sri Lanka 3rd T20I Arshdeep Singh

IND vs SL: टीम इंडियाचा 'हा' खेळाडू 48 तासात व्हिलन वरून बनला हिरो! शेवटच्या सामन्यात केला कहर

India vs Sri Lanka 3rd T20I Arshdeep Singh : भारतीय संघाने श्रीलंकेचा टी-20 मालिकेत पराभव केला. राजकोटच्या SCA स्टेडियमवर शनिवारी खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना टीम इंडियाने 91 धावांनी जिंकला.

सूर्यकुमार यादवच्या नाबाद शतकी खेळीमुळे भारताने 20 षटकांत 5 गडी गमावून 228 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 16.4 षटकांत 137 धावांत सर्वबाद झाला. दरम्यान असाही एक खेळाडू होता जो 48 तासात व्हिलन मधून बनला हिरो बनला होता.

हेही वाचा: IND vs SL: 'तू माझ्यापेक्षा जास्त...' सूर्याच्या धमाकेदार शतकावर DK हे काय बोलला

भारतीय संघाने त्यांच्या यजमानपदी खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत श्रीलंकेचा 2-1 असा पराभव केला. राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाने 20 षटकात 5 विकेट गमावून 228 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 16.4 षटकांत 137 धावांवर गारद झाला. सूर्यकुमार यादवने शानदार फलंदाजी करत 51 चेंडूत नाबाद 112 धावा केल्या. यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 9 षटकार मारले. शुभमन गिलने 46 तर अक्षर पटेलने 9 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या.

हेही वाचा: IND vs SL: सूर्य तापला अन् लंकेचं झालं दहन! मालिका हार्दिकच्या खिशात

अर्शदीप ठरला हिरो

पुण्यात खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला 'व्हिलन' बनला होता. त्याने त्या सामन्यात 5 नो बॉल फेकले होते. त्या सामन्यात भारताला 16 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. एवढेच नाही तर कर्णधार हार्दिक पांड्याने सामन्यानंतर सांगितले की, नो बॉल हा गुन्हा आहे. राजकोट टी-20 मध्ये हार्दिक त्याला संधी देणार नाही असे वाटत होते पण पांड्याने विश्वास ठेवला. आता 48 तासांनंतर झालेल्या सामन्यात अर्शदीपने चमकदार कामगिरी करत 2.4 षटकात 3 विकेट घेतले.

हेही वाचा: IND vs SL: 'तू माझ्यापेक्षा जास्त...' सूर्याच्या धमाकेदार शतकावर DK हे काय बोलला

कर्णधार हार्दिक पांड्याने सामन्यानंतर सांगितले की, 'कर्णधार म्हणून माझ्या आयुष्याचा उद्देश मी माझ्या खेळाडूंना पाठिंबा देईन. तो भारतातील सर्वोत्तम टी-20 क्रिकेटपटू आहे आणि म्हणूनच ते येथे आहे. या फॉरमॅटमध्ये शंका घेण्यास जागा नाही आणि आम्ही योग्य मार्गाने खेळाडूंना पाठीशी घालत आहोत. आम्ही मालिकेत ज्या पद्धतीने खेळलो ते आनंददायी आहे.