
IND vs SL: शाब्बास रे पठ्ठ्या! सूर्याच्या शतकावर विराटने इंस्टावर लावली आग
Suryakumar Yadav Ind vs Sl T20 : भारतीय क्रिकेट संघाने 2023 ची सुरुवात शानदार पद्धतीने केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत त्याने 2-1 ने विजय मिळवला. राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर शनिवारी झालेल्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने 91 धावांनी विजय मिळवला.
हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग तिसरी मालिका जिंकली आहे. जून 2022 मध्ये त्याने दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडचा 2-0 ने पराभव केला. त्याचवेळी नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने विजय मिळवला.
हेही वाचा: IND vs SL: सूर्य तापला अन् लंकेचं झालं दहन! मालिका हार्दिकच्या खिशात
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने सूर्यकुमार यादवच्या शतकी खेळीचे कौतुक केले आहे. सूर्यकुमारने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या टी-20 सामन्यात 51 चेंडूत नाबाद 112 धावांची खेळी केली. सूर्यकुमारचे क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधील हे तिसरे शतक ठरले. टी-20 मध्ये भारतीयाचे हे दुसरे सर्वात वेगवान शतक होते.
श्रीलंकेचे गोलंदाज सूर्यकुमार यादव पडू हतबल दिसले. सूर्याने 7 चौकार आणि 9 षटकारांच्या जोरावर त्याने नाबाद 112 धावा केल्या. विराट कोहलीने त्यानंतर आपल्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर सुर्याचा फोटो शेअर केला आणि अप्रतिम खेळी खेळल्याबद्दल जाळ आणि टाळ्या वाजवण्याचे इमोजीदेखील वापरले आहे.

हेही वाचा: IND vs SL 3rd T20: श्रीलंकेविरुद्ध अजय रथ कायम! 91 धावांनी पराभव करत मालिका 2-1 ने जिंकली
सूर्यकुमारने या सामन्यात 26 चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर शतकासाठी केवळ 19 चेंडू घेतले. त्याने 45 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि भारतासाठी टी-20 मधील दुसरे सर्वात जलद शतक ठोकले.
टी-20 क्रिकेटमधील तिसरे शतक झळकावणाऱ्या सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल आणि न्यूझीलंडच्या कॉलिन मुनरोची बरोबरी केली आहे. या दोन्ही फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये तीन शतके झळकावली आहेत.
हेही वाचा: IND vs SL: कासवछाप गिल! त्रिपाठी-सूर्या कानामागून आले अन् तिखट झाले
सूर्यकुमार यादवने जुलै 2022 मध्ये भारताकडून इंग्लंडविरुद्ध टी-20 मध्ये पहिले शतक झळकावले. त्याने 55 चेंडूत 117 धावांची खेळी केली. यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्ध 51 चेंडूत नाबाद 111 धावांची खेळी केली. आता त्याने श्रीलंकेविरुद्ध 51 चेंडूत नाबाद 112 धावांची खेळी केली.