IND vs SL : लंकेसमोरही टीम इंडियाचा डंका; मालिकेत 1-0 आघाडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs Sri Lanka, 1st T20I

IND vs SL : लंकेसमोरही टीम इंडियाचा डंका; मालिकेत 1-0 आघाडी

India vs Sri Lanka, 1st T20I : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) आणखी एक धडाकेबाज विजय नोंदवला आहे. लखनऊच्या मैदानात टीम इंडियाने श्रीलंकेचा धुव्वा उडवत तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 199 धावा करत श्रीलंका संघासमोर 200 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाला निर्धारित 20 षटकात 6 बाद 137 धावांपर्यंत मजल मारता आली. भारतीय संघाने पहिला सामना 62 धावांनी जिंकला.

हेही वाचा: रोहित शर्मा टी-20 चा नवा 'बादशहा'; किंग कोहलीलाही टाकलं मागे

भारतीय संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाची सुरुवात खराब झाली. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच चेंडूवर सलामीवीर पाथुम निसांकाला तंबूचा रस्ता दाखवला. वैयक्तिक दुसऱ्या षटकात भुवीन दुसर यश मिळवलं त्याने कामिल मिश्राला 13 धावांवर चालते केले. रोहित शर्माने त्याचा झेल टिपला. चरिथ असलंकाच्या अर्धशतकाशिवाय अन्य एकाही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. भारताकडून भुवनेश्वर कुमारने घेतलेल्या दोन विकेट्सशिवाय व्यंकटेश अय्यरनं दोन विकेट घेतल्या. जाडेजा आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

हेही वाचा: IND vs SL : ई'शानदार' सेंच्युरीची संधी हुकली; पण...

श्रीलंकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर रोहित शर्मा आणि ईशान किशन या जोडीनं त्याचा हा निर्णय व्यर्थ ठरवला. श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई करत या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 111 धावांची भागीदारी केली. कर्णधार रोहित शर्मा 32 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारासह 44 धावा करुन माघारी फिरला. त्यानंतर ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी लंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. ईशान किशनला सामन्यात शतकी खेळी करण्याची संधी होती. पण तो 89 धावा करून तंबत परतला. श्रेयस अय्यरने मोठी फटकेबाजी करत नाबाद 57 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला रविंद्र जाडेजाने संघाच्या धावसंख्येत 3 धावांची भर घातली. या जोरावर भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 2 बाद 199 धावा केल्या होत्या.

Web Title: Ind Vs Sl Team India Won By 62 Runs Against Sri Lanka And Lead 1 0 In T20 Series

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IND vs SL
go to top