Hardik Pandya Viral Video : टीम इंडियात फूट? भर मैदानात पांड्याने विराटला केलं फुल इग्नोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Hardik Pandya Virat Kohli Video

Hardik Pandya Viral Video : टीम इंडियात फूट? भर मैदानात पांड्याने विराटला केलं फुल इग्नोर

भारतीय फलंदाज विराट कोहली आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफानव्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या आधारे टीम इंडियाच्या दोन खेळाडूंमध्ये काहीतरी बिनसलं असल्याचं बोललं जात आहे. या दोन्ही दिग्गज खेळाडूंमध्ये फूट पडल्याची चर्चा आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ गुवाहाटी वनडे सामन्यादरम्यानचा आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना मंगळवारी गुवाहाटी येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 67 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला, मात्र या सामन्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये टीम इंडियाचे खेळाडू विकेट पडल्यानंतर सेलिब्रेशन करत होते, मात्र विराट कोहली आणि हार्दिक पांड्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, सेलिब्रेशनच्या वेळी सर्व खेळाडू विकेटच्या आनंदात एकमेकांना 'हाय फाइव्ह' करत होते, हार्दिक पंड्याने विराट कोहलीकडे दुर्लक्ष केले आणि त्याच्याशी हस्तांदोलन केले नाही.

हेही वाचा: Viral Video : कोयता गँगची ऐसी तैसी! आता पुणेकरांनीच हातात घेतला दंडूका

तसेच यादरम्यान हार्दिकचा हात कोहलीच्या डोक्यालाही लागला. कोहलीने माझ्या डोक्याला तुझा हात लागला, असे हार्दिकला सांगण्याच प्रयत्नही केला. पण हार्दीकने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे हार्दिकने जाणीवपूर्वक यावेळी कोहलीकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: IND vs SL: कुलदीप यादवने आपल्याच मित्राची केली गोची; आता पुनरागमन झालं अवघड

दोन्ही खेळाडूंमध्ये सर्व काही ठीक नाही का?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंच्या आधारे चाहत्यांकडून विराट कोहली आणि हार्दिक पांड्यामध्ये सर्व काही ठीक नसल्याचा अंदाज लावला जात आहे. चाहते सतत कमेंट करून या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा: IND vs SL 2nd ODI : भारताने श्रीलंकेचा केला 4 विकेट्सनी पराभव; मालिका घातली खिशात

कोहली - हार्दीकमध्ये काय झालं होतं?

विराट कोहलीने गुवाहाटी वनडेमध्ये त्याच्या ODI कारकिर्दीतील 45 वे शतक झळकावले. हार्दिकच्या चुकीमुळे त्याचे शतक हुकले असले तरी. सामन्याच्या 43 व्या षटकात कोहली शतकाच्या जवळ पोहोचला होता.

यादरम्यान कोहलीने कसून राजिथाच्या चेंडूवर ऑन साइड शॉट खेळला आणि वेगाने धाव पूर्ण केली. चेंडू विकेटपासून खूप दूर होता आणि क्षेत्ररक्षकही वेगाने पोहोचू शकत नव्हता, त्यामुळे अशा स्थितीत त्याला दुसरी धाव घ्यायची होती, पण दरम्यान, हार्दिकने धाव घेण्यास नकार दिला.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कोहली दुसर्‍या धावांसाठी अर्ध्या क्रीजपर्यंत पोहोचला होता आणि कसा तरी नॉन-स्ट्राइकिंग एंडपर्यंत परत जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर कोहलीने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली. तेव्हापासून दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता.

दुसऱ्या सामन्यात काय झालं?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याबाबत बोलायचे झाले तर, दाशून शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, श्रीलंकेच्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरला नाही. श्रीलंकेचा संघ 39.4 षटकात अवघ्या 215 धावांवर गारद झाला.

भारताने श्रीलंकेचे 216 धावांचे आव्हान 6 विकेट्सच्या मोबदल्यात 44 व्या षटकात पार केले. भारताकडून केएल राहुलने संयमी अर्धशतक (103 चेंडूत नाबाद 64 धावा) करत भारताचा विजय निश्चित केला. कोलकाता येथे खेळवण्यात आलेल्या या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने श्रीलंकेचा 4 विकेट्सनी पराभव करत मालिकेत 2 - 0 अशी विजय आघाडी घेतली