IND vs WI : टेन्शन फ्री पंत! भन्नाट मीम्स व्हायरल

 Rishabh Pant Photo Goes Viral
Rishabh Pant Photo Goes Viral Sakal
Updated on

IND vs WI, 2nd ODI : वेस्ट इंडीज विरुद्धच्या दुसऱ्या वनडेत रिषभ पंतला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. अंडर 19 वर्ल्ड कपनंतर पहिल्यांदाच तो टीम इंडियासाठी सलामीला आला. पण या संधीच सोनं करण्यात तो अपयशी ठरला. अवघ्या 18 धावांवर तो बाद झाला. ऑफ स्टंम्पच्या बाहेरचा चेंडू ओढून ताणून मारण्याच्या नादात त्याने विकेट फेकली. (IND vs WI 2nd ODI Tension Free Rishabh Pant Sleeping Near Boundary Line Photo Goes Viral)

रिषभ पंतच नव्हे तर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही नावाला साजेसा खेळ करता आला नाही. रोहित शर्माने अवघ्या 5 धावांची भर घातली. तर कोहली 18 धावा करुन परतला. बाद झाल्यानंतर रिषभ पंतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत तो सीमारेषेबाहेर जमीनीवर निवांत पडून गप्पा मारताना दिसते. यावरुन नेटकरी त्याला ट्रोल करत आहे. 'आग लगे बस्ती में हम आपने मस्ती में' अशा शब्दांत काहींनी पंतवर तोंडसुख घेतल आहे. याशिवाय अनेक मीम्सच्या माध्यमातून त्याला ट्रोल करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com