
IND vs WI Playing 11 Prediction : ऋतूराज पुन्हा बाकावरच बसणार?
India vs West Indies, 1st T20I :भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला बुधवारपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील सर्व सामने कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. ही मालिका आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने भारतीय संघासाठी (Team India) महत्त्वपूर्ण मानली जात आहे. वनडे मालिकेत वेस्ट इंडीज संघ (West Indies Team) ढेपाळला असला तरी टी-20 मालिकेत त्यांना कमी लेखून चालणार नाही. टी-20 संघात त्यांच्याकडे 'एक से बढकर एक' खेळाडू आहे. त्यामुळे दोन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनला हलक्यात घेऊन चालणार नाही. दोन्ही संघात कांटे की टक्कर पाहायला मिळू शकते.
टी-20 मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. वाशिंग्टन सुंदर, लोकेश राहुल आणि अक्षर पटेल यांनी मालिकेतून माघार घेतली होती. कुलदीप यादवला संघात स्थान मिळाले असून त्याला तीन पैकी एका सामन्यात तरी संधी मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
हेही वाचा: आधी टीम इंडिया मग IPL; रोहितनं सांगितला 'मेगा प्लॅन'
सामना कुठे आणि कधी
पहिला टी-20 सामना – भारत विरुद्ध वेस्ट इंडीज
स्थान – ईडन गार्डन्स, कोलकाता
कधी – 16 फेब्रुवारी, भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता
लाइव स्ट्रीमिंग – स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिज्नी प्लस हॉटस्टार
हेही वाचा: आधी फसली मात्र, कमी वयामुळे वाचली! गोल्ड मेडलचं काय?
पिच रिपोर्ट
कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानातील खेळपट्टीचा विचार केल्याच या ठिकाणी फलंदाजांना चांगला सूर गवसण्याची संधी अधिक असेल. त्यामुळे टॉस जिंकणारा संघ पहिल्यांदा गोलंदाजी घेऊन धावांचा पाठलाग करण्यास पसंती देताना दिसू शकते.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन भारत
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक चहर, शार्दुल ठाकुर, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन वेस्ट इंडीज
ब्रँडन किंग, कायल मेयर्स, रोमारियो शेफर्ड, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), कायरन पोलार्ड (कर्णधार), रोवमन पॉवेल, जेसन होल्डर, फेबियन एलन, ओडियन स्मिथ, अकील हुसैन, शैल्डन कोट्रेल.
संभाव्य Dream11 :
रिषभ पंत, ईशान किशन, रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, कायल मेयर्स, रोवमन पॉवेल, जेसन होल्डर (उप-कर्णधार), रोमारियो शेफर्ड, दीपक चहर, हर्षल पटेल, ओडियन स्मिथ.
Web Title: Ind Vs Wi Dream11 Prediction Fantasy Cricket Tips Playing 11 Pitch Report 1st T20i
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..