IND vs WI : रोहितने 'या' खेळाडूंची संघातून केली हकालपट्टी! कर्णधार पांड्याची मास्टर कार्ड खेळी अन्...

IND vs WI Rohit Sharma
IND vs WI Rohit Sharma

IND vs WI : भारतीय संघाच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कसोटी आणि एकदिवसीय संघांची घोषणा आधीच करण्यात आली होती. बुधवार 5 जुलैच्या रात्री टी-20 संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. हार्दिक पांड्याकडे पुन्हा एकदा युवा संघाची कमान सोपवण्यात आली आहे.

IND vs WI Rohit Sharma
Wi vs Ind T20 Squad: BCCI ने 'या' खेळाडूंची टी-20 कारकीर्द संपवली! वेस्ट इंडिज दौऱ्यातून अचानक दिला डच्चू

टीम इंडियाच्या एका खेळाडूची संपलेली कारकीर्द बीसीसीआयने वाचवली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टी-20 संघात या खेळाडूचा समावेश करून बीसीसीआयने एक प्रकार जीवन दिले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या T20 संघातून वगळलेल्या खेळाडूला आता हार्दिक पांड्याने त्याच्या कर्णधारपदाखाली संधी दिली आहे.

IND vs WI Rohit Sharma
Duleep Trophy : सरफराज खान शुन्यावर बाद, पुजारा-सुर्याही फ्लॉप

भारताचा घातक लेग-स्पिन गोलंदाज रवी बिश्नोईची वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली आहे. रवी बिश्नोईने त्याचा शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना 4 सप्टेंबर 2022 रोजी आशिया कप 2022 मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. शेवटचा एकदिवसीय सामना 6 ऑक्टोबर 2022 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला गेला. यानंतर या घातक लेगस्पिनरला टीम इंडियातून वगळण्यात आले.

IND vs WI Rohit Sharma
WI vs IND India's T20I squad : तिलक वर्मा, यशस्वी जैसवालला लागली टी 20 ची लॉटरी; रिंकू सिंहकडे केलं दुर्लक्ष

युझवेंद्र चहलच्या तुलनेत रवी बिश्नोई हा अतिशय धोकादायक लेगस्पिनर आहे. रवी बिश्नोईने आतापर्यंत भारतासाठी 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 17.12 च्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या सरासरीने 16 बळी घेतले आहेत. युझवेंद्र चहलमुळे रवी बिश्नोईची टी-20 विश्वचषक 2022 मध्ये निवड झाली नाही. युझवेंद्र चहलला 2022 च्या संपूर्ण टी-20 विश्वचषकात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

रवी बिश्नोईने यंदाही आयपीएल 2023 मध्ये चमकदार कामगिरी करून निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. रवी बिश्नोईने यावर्षी IPL 2023 च्या 15 सामन्यात 16 विकेट घेतल्या. वेगवान गोलंदाज आवेश खान आणि लेग-स्पिनर रवी बिश्नोई हे दोन खेळाडू आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन केले आहे. संघात तीन मनगट फिरकीपटू आहेत ज्यात कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल हे देखील 15सदस्यीय संघात आहेत. असे करून बीसीसीआयने मोठे मास्टर कार्ड खेळले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com