WI vs IND : Hotstar, Sony Liv नाही तर 'या' अ‍ॅपवर फ्रीमध्ये पाहता येणार पहिला कसोटी सामना!

West Indies Vs India 1st Test
West Indies Vs India 1st Test

West Indies Vs India 1st Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बुधवारपासून डॉमिनिका विंडसर पार्क येथे खेळल्या जाणार आहे. हे दोन्ही कसोटी सामने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या नवीन चक्राचा भाग आहेत. त्यामुळे दोन्ही संघ जिंकण्यासाठी सर्वोत्तम कामगिरीसह मैदानात उतरतील. तुम्‍हाला हा सामना कधी, कुठे आणि कोणत्‍या वेळी पाहता येईल…

सामना किती वाजता सुरू होईल?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3:30 वाजता संपतील.

West Indies Vs India 1st Test
Team India : टीम इंडियाला पुढचा बुमराह मिळणार; BCCI नं केलंय मोठं प्लॅनिंग

तुम्ही सामना कुठे पाहू शकता?

तुम्हाला Hotstar किंवा Sony Liv वर बघायला मिळणार नाही. त्यापेक्षा चांगली बातमी अशी आहे की वेस्ट इंडिज दौऱ्यावर खेळले जाणारे सर्व सामने तुम्ही Jio सिनेमावर मोफत पाहू शकता.

या दौऱ्यात टीम इंडिया एकूण किती सामने खेळणार ?

टीम इंडियाला वेस्ट इंडिज दौऱ्यावर 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 T20I सामने खेळायचे आहेत. 12 जुलैपासून कसोटी मालिका, 27 जुलैपासून एकदिवसीय मालिका आणि 3 ऑगस्टपासून टी-20 मालिका सुरू होणार आहे.

West Indies Vs India 1st Test
Lucknow Super Giants : लखनौ सुपर जायंट्सला मिळणार नवा कोच; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचे नाव आघाडीवर

दोन्ही संघ

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, अजिंक्य रहाणे, केएस भरत, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव आणि नवदीप सैनी.

वेस्ट इंडिज संघ: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), तेजनारिन चंदरपॉल, रहकीम कॉर्नवॉल, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानेगे, अल्झारी जोसेफ, किर्क मॅकेन्झी, रॅमन रेफर, जोशुआ दा सिल्वा, शॅनन गॅब्रिएल, जेसन होल्डर, केमार रोच आणि जोमेल वॉरिकन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com