Ind vs Ire T20 WC: टीम इंडिया उपांत्य फेरीत! डकवर्थ लुईस नियमानुसार भारताचा विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ind vs Ire T20 WC: टीम इंडिया उपांत्य फेरीत! डकवर्थ लुईस नियमानुसार भारताचा विजय
Live

Ind vs Ire T20 WC: टीम इंडिया उपांत्य फेरीत! डकवर्थ लुईस नियमानुसार भारताचा विजय

IND W vs IRE W T20 World Cup Live Score : आज भारतीय महिला क्रिकेट संघ आयर्लंडशी गटातील आपला शेवटचा सामना खेळल्या गेला. भारताने डकवर्थ लुईस पद्धतीने ग्रुप-बी मधील शेवटच्या सामन्यात आयर्लंडचा पाच धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली आहे. या गटातून इंग्लंडचा संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. सध्या इंग्लंड ब गटातील गुणतालिकेत तीन सामन्यांत तीन विजय आणि सहा गुणांसह अव्वल स्थानावर आहे.

12:42 PM,  Feb 20 2023

टीम इंडिया सेमी फायनल मध्ये जाणार? जिंकले नाणेफेक अन्...

भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार हरमनने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. राधा यादव हा सामना खेळत नाहीत. त्यांच्या जागी देविका वैद्यचा संघात समावेश करण्यात आला आहे.

01:33 PM,  Feb 20 2023

टीम इंडियाच्या आक्रमक सुरुवात

भारत-आयर्लंडशी सामन्याचे सहा षटक संपला आहे. भारताने एक पण विकेट न गमावता 42 धावा केल्या आहेत. मंधाना शेफालीपेक्षा वेगाने धावा करत आहे. मंधानाने वैयक्तिक 27 आणि शेफालीने 15 धावा केल्या आहेत.

01:51 PM,  Feb 20 2023

भारताला पहिला धक्का

भारताला 10व्या षटकात 62 धावांवर पहिला धक्का बसला. शेफालीला 29 चेंडूत 24 धावा करून बाद झाली. सध्या स्मृती मंधाना 29 चेंडूत 33 धावा करून क्रीजवर आहे तर कर्णधार हरमनप्रीत कौरने एक धाव घेतली आहे. 10 षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर 63 अशी आहे.

02:03 PM,  Feb 20 2023

 'षटकार' मारत स्मृती मंधानाने ठोकले अर्धशतक

भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधानाने टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 22वे अर्धशतक झळकावले आहे. त्याने आयर्लंडविरुद्ध षटकार ठोकून आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचे या स्पर्धेतील हे दुसरे अर्धशतक आहे. 14 षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर 95 अशी आहे.

02:23 PM,  Feb 20 2023

16व्या षटकात भारताला दोन मोठे झटके

भारताला 16व्या षटकात दोन मोठे झटके बसले आहे. डेलनीने आधी हरमनप्रीत कौरला झेलबाद केले. 20 चेंडूत 13 धावा करून ती बाद झाली. यानंतर पुढच्याच चेंडूवर रिचा घोषला बाद केले. रिचाला खातेही उघडता आले नाही. भारताची धावसंख्या 16 षटकांनंतर 3 बाद 115 अशी आहे.

02:33 PM,  Feb 20 2023

स्मृती मंधानाचे शतक हुकली! भारताला पुन्हा एका षटकात दोन धक्के

भारताला लागोपाठ दोन धक्के बसले आहे. मानधनाचे शतक हुकले. दीप्ती खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतली.

02:54 PM,  Feb 20 2023

भारताने पहिल्याच षटकात आयर्लंडला दिले दोन धक्के

आयर्लंड संघाला डावाच्या पहिल्याच षटकातच दोन धक्के बसले. अॅमी हंटर डावाच्या पहिल्याच चेंडूवर धावबाद झाली. यानंतर रेणुकी सिंगने पाचव्या चेंडूवर प्रेंडरगास्टला क्लीन बोल्ड केले. तिला खातेही उघडता आले नाही. एका षटकानंतर आयर्लंडची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात पाच धावा आहे.

03:30 PM,  Feb 20 2023

पावसामुळे सामना थांबला! डकवर्थ लुईस नियमानुसार भारताची काय परिस्थिती

पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे. आयर्लंडने 8.2 षटकांत दोन गडी गमावून 54 धावा केल्या आहेत. आता पाऊस थांबला नाही आणि डकवर्थ लुईस नियम लागू झाला तर भारत या नियमानुसार पाच धावांनी पुढे आहे. म्हणजेच पाऊस जर थांबला नाही तर भारताचा विजय निश्चित आहे. आयर्लंडला हा सामना जिंकायचा असेल तर 8.2 षटकात 59 धावा करायच्या होत्या. डकवर्थ लुईस पद्धतीनुसार आयर्लंडचा संघ पाच धावांनी मागे आहे.