esakal | स्वच्छंदतर्फे स्वातंत्र्यदिनी युनम शिखरावर तिरंगा 
sakal

बोलून बातमी शोधा

Swachanda-Foundation

स्वच्छंद ऍडव्हेंचर फाउंडेशनच्या गिर्यारोहकांनी 15 ऑगस्ट रोजी युनम शिखरावर तिरंगा झळकाविला. स्वच्छंदची ही सलग दुसरी यशस्वी मोहीम आहे. अलीकडेच त्यांनी नंदा घुंटीजवळील अनामिक शिखर सर केले होते. 

स्वच्छंदतर्फे स्वातंत्र्यदिनी युनम शिखरावर तिरंगा 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पुणे : स्वच्छंद ऍडव्हेंचर फाउंडेशनच्या गिर्यारोहकांनी 15 ऑगस्ट रोजी युनम शिखरावर तिरंगा झळकाविला. स्वच्छंदची ही सलग दुसरी यशस्वी मोहीम आहे. अलीकडेच त्यांनी नंदा घुंटीजवळील अनामिक शिखर सर केले होते. 

युनम शिखराची उंची 6113 मीटर आहे. पहाटे तीन वाजता अंतिम चढाई सुरू करून अनिल बोंडे, तृप्ती जोशी आणि लीडर अनिकेत कुलकर्णी सकाळी दहा वाजता शिखरावर पोचले. आशिष शिंदेने हिमालयातील पहिल्याच मोहिमेत 5360 मीटरपर्यंत मजल मारली, पण शारीरिक तक्रारींमुळे त्याला माघार घ्यावी लागली. 

खडतर मार्ग, थेट चढाई, अनिश्‍चित हवामान, बोचरे वारे आणि अतीउंचीवरील विरळ हवा अशी मोहिमेतील आव्हाने होती. शेर्पा-गाइड, कुक किंवा हेल्पर यांच्या मदतीशिवाय स्वयंपूर्ण आखणी करून मोहीम यशस्वी करण्यात आली. रुट ओपनिंग, लोड फेरी, कॅम्प व्यवस्थापन, कुकिंग हे सर्व गिर्यारोहकांनी केले. 
चार ऑगस्ट रोजी पुण्याहून संघ निघाला. तो सहा ऑगस्टला मनालीत दाखल झाला. दहा ऑगस्ट रोजी मनाली-लेह महामार्गावरील भरतपूर येथे 4600 मीटर उंचीवर बेस कॅंप लावण्यात आला. समिट कॅम्प 5160 मीटर उंचीवर होता. पुढे 850 मीटर चढाईचा मार्ग 40 ते 50 अंश कोनातला होता. आगामी काळात अशाच आव्हानात्मक मोहिमा आखण्याचा मानस अनिकेतने व्यक्त केला. 

loading image
go to top