Asia Cup 2023: भारताचा नेपाळवर अपेक्षित विजय! 9 विकेट अन् 167 चेंडू राखून केला पराभव

ACC Emerging Asia Cup
ACC Emerging Asia Cup
Updated on

ACC Emerging Asia Cup : आशिया करंडक इमर्जिंग क्रिकेट स्पर्धेत भारताने नेपाळवर नऊ विकेट आणि १६७ चेंडू राखून अपेक्षेप्रमाणे पराभव केला. या स्पर्धेत भारताला हा दुसरा विजय आहे, आता पुढची लढत पाकविरुद्ध होणार आहे.

नेपाळच्या तुलनेत भारताचे खेळाडू कितीतरी पटीने अनुभवात उजवे आहेत, तोच फरक आजच्या सामन्यातून दिसून आला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या नेपाळचा डाव ३९.२ षटकांत संपुष्टात आला. कर्णधार रोहित पौदेलने अर्धशतकी भागीदारी केली.

ACC Emerging Asia Cup
IND vs WI 2nd Test Playing XI: दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाची प्लेइंग-11 बदलणार, कोणाला मिळणार डच्चू?

भारताकडून वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगरगेकरने तीन, तर हर्षित राणाने दोन विकेट मिळवल्या. मात्र निशांत सिंधूने २० चेंडूतच चार विकेट मिळवण्याची कामगिरी केली.

भारतीयांना १६८ धावांचे माफक आव्हान २२.१ षटकांतच पार केले. साई सुदर्शन ५२ चेंडूत ५८ धावा करून बाद झाला, तर दुसरा सलामीवीर अभिषेक शर्माने ६९ चेंडूंतच ८७ धावांची खेळी केली. शतक झळकावण्याची संधी मात्र हुकली.

ACC Emerging Asia Cup
कसोटी सामन्यासाठी Playing 11 ची घोषणा! 'या' खेळाडूला दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता

संक्षिप्त धावफलक ः नेपाळ ः ३९.२ षटकांत १६७ (रोहित पौदेल ६५, गुलशन झा ३८, हर्षित राणा ५-१-१६-२, राजवर्धन हंगरगेकर ६-१-२५-३, निशांत सिंधू ३.२-०-१४-४) पराभूत वि. भारत ः २२.१ षटकांत १ बाद १७२ (साई सुदर्शन ५८, अभिषेक शर्मा ८७ -६९ चेंडू, १२ चौकार, २ षटकार).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.