IND vs NZ : रोहित - राहुलच्या पर्यायाची चाचपणी तर भुवनेश्वरसाठी अखेरची फडफड?

India and New Zealand T20I Series
India and New Zealand T20I Series esakal

India and New Zealand T20I Series : भारताला 2013 पासून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यश आलेले नाही. नुकत्याच ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये देखील भारताला सेमी फायनलमध्ये आपला गाशा गुंडळावा लागला. यानंतर टीम इंडियात बादलाचे वारे वाहू लागले आहेत. जर भारताला 2024 मधील टी 20 वर्ल्डकप जिंकायचा असेल तर आतापासूनच कामाला लागायला हवं. या दृष्टीकोणातून न्यूझीलंडविरूद्धची तीन टी 20 सामन्यांची मालिका ही महत्वाची ठरते.

India and New Zealand T20I Series
NZ vs IND 1st T20I : पहिलाच भारत - न्यूझीलंड सामना होणार रद्द; वेलिंग्टनमध्ये पडणार तुफान पाऊस?

या मालिकेसाठी भारताचा पूर्णवेळ कर्णधार रोहित शर्मा, कामगिरीत सातत्य नसलेला केएल राहुल, विराट कोहली, आर. अश्विन या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. संघाचे नतृत्व नव्या दमाचा हार्दिक पांड्या करत आहे. त्यामुळे या मालिकेपासूनच नवा टी 20 संघ बांधणीचे काम सुरू करण्यास हरकत नाही. या मालिकेतून रोहित शर्मा आणि केएल राहुल या सलामीजोडीला कोणती सलामी जोडी पर्याय ठरू शकतो याचबाबची चाचपणी होणार आहे. यात शुभमन गिल - इशान किशन ही उजवी आणि डावखुरी जोडी कशी कामगिरी करते? ऋषभ पंतला सलामीला पाठवण्याचा विचार केला जातो का? मॅच फिनिशर म्हणून हार्दिकच्या जोडीला कोण? संजू सॅमसन मॅच फिनिशर होऊ शकतो का? या प्रश्नांची उत्तरे शोधली जातील.

India and New Zealand T20I Series
NZ vs IND : Amazon Primeसाठी खर्च करण्याची नाही गरज, भारत-न्यूझीलंड सामना येथे पहा 'फ्री'

याचबरोबर भुवनेश्वर कुमारचे टी 20 मधील भवितव्य देखील या मालिकेत निश्चित होईल. जरी भुवनेश्वर कुमारने 2022 च्या कॅलेंडर वर्षात 30 सामन्यात 36 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यासमोर सध्या आयर्लंडच्या जोशुआ लिटिलच्या 39 विकेट्सचे (2022) रेकॉर्ड आहे. असे असले तरी भविष्याच्या दृष्टीने भारताला नवा गोलंदाज शोधावा लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com