Thomas Uber Cup 2026: लक्ष्य सेन, पी. व्ही. सिंधू यांच्यावर मदार; थॉमस आणि उबेर करंडक बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारताचे संघ जाहीर

Lakshya Sen And PV. Sindhu: २४ एप्रिल ते ३ मे २०२६ दरम्यान डेन्मार्कमध्ये होणाऱ्या थॉमस आणि उबेर करंडक बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारताने संघ जाहीर केला आहे. पुरुष संघात लक्ष्य सेन, आयुष शेट्टी, किदांबी श्रीकांत यांसह अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समावेश आहे.
Thomas Uber Cup 2026

Thomas Uber Cup 2026

sakal

Updated on: 

नवी दिल्ली : थॉमस व उबेर ही प्रतिष्ठेची बॅडमिंटन स्पर्धा यंदा २४ एप्रिल ते ३ मे या कालावधीत डेन्मार्क येथे खेळवण्यात येणार असून, या दोन्ही स्पर्धांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. थॉमस करंडकात पुरुषांचा, तर उबेर करंडकात महिलांचा समावेश असतो. लक्ष्य सेन व पी. व्ही. सिंधू या दोन खेळाडूंवर भारतीय संघाची मदार अवलंबून असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com