Under 19 Cricket World Cup : भारताकडून न्यूझीलंडचा धुव्वा ; मुशीर खानचे दुसरे शतक, २१४ धावांनी विजय

मुशीर खानच्या शानदार शतकामुळे २९५ धावांची मोठी धावसंख्या उभारणाऱ्या भारताने न्यूझीलंडचा ८१ धावांत धुव्वा उडवला आणि १९ वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट सर्धेत सुपर सिक्समध्ये तब्बल २१४ धावांनी विजय मिळवला.
cricket
cricketsakal

ब्लोएमफौंटेन : मुशीर खानच्या शानदार शतकामुळे २९५ धावांची मोठी धावसंख्या उभारणाऱ्या भारताने न्यूझीलंडचा ८१ धावांत धुव्वा उडवला आणि १९ वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट सर्धेत सुपर सिक्समध्ये तब्बल २१४ धावांनी विजय मिळवला. आपला मोठा भाऊ सर्फराझ खानच्या भारतीय संघाच्या निवडीचा आनंद मुशीर खानने शतक झळकावून साजरा केला. १९ वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत मुशीरने आज शानदार १३१ धावांची खेळी केली. त्यानंतर त्याने गोलंदाजीत १० धावांत २ विकेटही मिळवल्या.

या स्पर्धेतले मुशीर खानचे हे दुसरे शतक आहे. १९ वर्षांखाली विश्वकरंडक स्पर्धेत दोन शतके करण्याचा विक्रम भारताकडून शिखर धवनने केलेला आहे. या स्पर्धेत आत्तापर्यंतच्या सर्व लढती मिळून मुशीर खान सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. मुशीर खानने १२६ चेंडूतच १३१ धावांची खेळी केली त्यात त्याने १३ चौकार आणि तीन षटकार मारले. यातील एक षटकार धोनीच्या हॅलिकॉप्टर शॉट प्रमाणे होते.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारतास फलंदाजी दिली आणि अर्निश कुलकर्णीला लवकर बाद करण्यात त्यांना यश आले. मुशीर खान पाचव्या षटकांत मैदानात आला आणि त्यानंतर भारतीयांचे वर्चस्व राहिले. मुशीरने प्रथम दुसरा सलमीवीर आदर्श सिंगसह दुसऱ्या विकेटसाठी ७७ तर कर्णधार उदय सहारनसह तिसऱ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी करुन भारताच्या मोठ्या धावसंखेचा पाया रचला. ३४ धावा करणारा सहारन बाद झाल्यावर मुशीरने एका बाजूने चांगली टोलेबाजी करुन धावांचा वेग कायम ठेवला. या दरम्यान खेळपट्टी काहीशी संथ होत गेली होती, पण जम बसलेल्या मुशीरने एकेही-दुहेरी धावाही तेवढ्याच चपळाईने काढल्या.

भारताचे हे आव्हान न्यूझीलंडला पेललेच नाही. लिम्बानी याने पहिल्याच षटकात दोन फलंदाज बाद केले या धक्यातून न्यूझीलंडचा संघ सावरलाच नाही. सौम्य पांडेने चार विकेट मिळवले त्यामुळे न्यूझीलंडचा डाव २९ षटकांतच संपला.

cricket
Cricket News : डिज्नेसोबतचाही करार मोडला; ZEE आयसीसी स्पर्धांचे भारतातील प्रसारण हक्क देखील गमावणार?

संक्षिप्त धावफलक : भारत : ५० षटकांत ८ बाद २८५ (आदर्श सिंग ५२ - ५८ चेंडू, ६ चौकार, मुशीर खान १३१ - १२६ चेंडू, १३ चौकार, ३ षटकार, उदय सहारन ३४, अरावेली अविनाश १७, मॅसन क्लार्क ८-०-६२-४, रायन टॉर्सोगास ६-०-२८-१) वि. वि. न्यूझीलंड : २८.१ षटकांत सर्वबाद ८१ (ऑस्कर जॅकसन १९, राज लिम्बानी ६-२-१७-२, सौम्य पांडे १०-२-१९-४, मुशीर खान ३.१-०-१०-२)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com