esakal | INDvsSA : मनिष पांडे बरसला; भारताने मालिका घातली खिशात
sakal

बोलून बातमी शोधा

Manish-Pandey

पाऊस आणि खराब मैदानामुळे सामना 30 षटकांचा खेळविण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका संघाने 30 षटकांत 8 बाद 207 धावा केल्या.

INDvsSA : मनिष पांडे बरसला; भारताने मालिका घातली खिशात

sakal_logo
By
वृत्तसंस्था

तिरुवनंतपुरम : कर्णधार मनिष पांडेच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारत अ संघाने आज (सोमवार) तिसऱ्या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. भारतीय अ संघाने तिसरा सामना चार गडी राखून जिंकला. 

पाऊस आणि खराब मैदानामुळे सामना 30 षटकांचा खेळविण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका संघाने 30 षटकांत 8 बाद 207 धावा केल्या. मॅथ्यू ब्रीट्‌झके (36) याच्या आक्रमक खेळीनंतर हेन्‍रीक क्‍लासेन याच्या फटकेबाजीमुळे त्यांचे आव्हान उभे राहिले. भारताकडून दीपक चहर आणि कृणाल पंड्या यांनी दोन गडी बाद केले. 

आव्हानासाठी 208 धावांचा पाठलाग करताना भारताने 27.5 षटकांत 6 बाद 208 धावा केल्या. पण, त्यांची सुरवात निराशाजनक होती. ऋतुराज गायकवाड, रिकी भुई आणि कृणाल पंड्या झटपट बाद झाल्याने भारत अ संघा 3 बाद 26 असा अडचणीत आला होता. त्या वेळी प्रथम इशान किशन आणि मनिष पांडे यांनी चौथ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी करताना डाव सावरला. त्यावेळी ईशान आणि नविन राणा पाठोपाठ बाद झाल्याने भारताचा डाव पुन्हा अडचणीत आला.

त्या वेळी मनिष पांडेने शिवम दुबेला साथीला घेत 30 चेंडूंतच सहाव्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. विजया जवळ असतानाच पांडे बाद झाला. त्याने 59 चेंडूंत 3 चौकार, 5 षटकारांसह 81 धावा केल्या. शिवमने अखेरीस क्षर पटेलच्या साथीत विजय साकार केला. शिवम 28 चेंडूंत 2 चौकार, 3 षटकारांसह 45 धावा काढून नाबाद राहिला. 

संक्षिप्त धावफलक :
दक्षिण आफ्रिका अ
30 षटकांत 8 बाद 207 (हेन्‍रिक क्‍लासेन 44, मॅथ्यू ब्रीट्‌झके 36, दीपक चहर 6-0-42-2, कृणाल पंड्या 5-0-23-3) पराभूत वि. भारत अ 27.5 षटकांत 6 बाद 208 (मनिष पांडे 81, शिवम दुबे नाबाद 45, ऍन्‍रिच नॉर्टजे 5.5-0-41-2, जॉर्ज लिंडे 5-0-41-2)

loading image
go to top