esakal | भारताची कॅनडाशी कॅनडामध्ये लढत
sakal

बोलून बातमी शोधा

भारताची कॅनडाशी कॅनडामध्ये लढत

भारताची कॅनडाशी कॅनडामध्ये लढत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - डेव्हिस करंडक पुरुष सांघिक टेनिस स्पर्धेच्या जागतिक गट "प्ले-ऑफ' लढतींचा ड्रॉ जाहीर झाला आहे.

भारतासाठी ड्रॉ खडतर ठरला आहे. भारताची कॅनडाविरुद्ध कॅनडामध्ये लढत होईल. 15 ते 17 सप्टेंबरदरम्यान या लढती होतील. स्पर्धेच्या इतिहासात दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने आले आहे. भारताने सलग चौथ्या वर्षी जागतिक गट "प्ले-ऑफ' लढतीत प्रवेश केला, तर कॅनडाला जागतिक गटाच्या पहिल्या फेरीत ब्रिटनविरुद्ध पराभूत व्हावे लागले. कॅनडाकडे एकेरीप्रमाणेच दुहेरीतही मातब्बर खेळाडू आहेत. एकेरीत मिलॉस राओनिच सहाव्या क्रमांकावर आहे. त्याने गेल्या वर्षी विंबल्डन उपविजेतेपद मिळविले होते. ब्रिटनविरुद्ध तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही. वाचेक पोस्पीसील 119व्या क्रमांकावर आहे. याशिवाय पीटर पोलॅन्स्की 127व्या स्थानावर आहे. दुहेरीत डॅनिएल नेस्टर आहे.

भारतीय कर्णधार महेश भूपती यांनी सांगितले, की "ही लढत खेळताना मजा येईल. कॅनडाकडे काही प्रमुख खेळाडू आहेत. त्यांच्याविरुद्ध सर्वोच्च पातळीवर खेळण्याचे आव्हान आमच्या संघासमोर असेल.'