FIFA World Cup Qualifying : कतारविरुद्धच्या सामन्यासाठी ; भारतीय संघ जाहीर

फिफा विश्वकरंडक पात्रता एएफसी आशिया करंडकाच्या अंतिम सामन्यासाठी भारताचे प्रशिक्षक इगोल स्टिमॅक यांनी २३ खेळाडूंचा संघ जाहीर केला. सुनील छेत्रीच्या निवृत्तीनंतर भारतीय संघ प्रथमच महत्त्वाच्या सामन्यात खेळणार आहे.
FIFA World Cup Qualifying
FIFA World Cup Qualifyingsakal

कोलकता : फिफा विश्वकरंडक पात्रता एएफसी आशिया करंडकाच्या अंतिम सामन्यासाठी भारताचे प्रशिक्षक इगोल स्टिमॅक यांनी २३ खेळाडूंचा संघ जाहीर केला. सुनील छेत्रीच्या निवृत्तीनंतर भारतीय संघ प्रथमच महत्त्वाच्या सामन्यात खेळणार आहे.

दोहामध्ये होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ रविवारी रवाना होणार आहे. ११ जून रोजी अल रायन येथील अहमद बिन अली स्टेडियममध्ये भारताचा बलाढ्य कतारविरुद्ध सामना होणार आहे.

काही दिवसांपूर्वी कोलकतामध्ये कुवेतविरुद्धचा भारताचा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला होता. त्यामुळे गटामध्ये भारतीय संघ पाच गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पात्रता स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत स्थान मिळवायचे असेल, तर भारताला कतारविरुद्ध विजय आवश्यक आहे; परंतु आता सुनील छेत्रीशिवाय ही कामगिरी करावी लागणार आहे. कतारने अगोदरच तिसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चित केलेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com