Team India दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना

Indian Cricket Team
Indian Cricket Teamesakal
Summary

भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी नुकताच रवाना झाला आहे.

भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यासाठी नुकताच रवाना झाला आहे. टीम इंडियाला 26 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका (Test series) आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका (ODI series) खेळावी लागणार आहे. एकदिवसीय मालिका 19 जानेवारीपासून सुरू होणार आहे. भारतीय संघ मुंबईहून (Mumbai) थेट दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी नुकताच रवाना झालाय. बीसीसीआयनं (BCCI) गुरुवारी सकाळी आपल्या ट्विटर अकाऊंटवर भारतीय खेळाडूंचे चार फोटो शेअर केलेत, त्यात खेळाडू फ्लाइटमध्ये बसलेले दिसत आहेत.

बोर्डानं या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी सर्व एकत्र', असं म्हंटलंय. बीसीसीआयनं सोशल मीडियावर 4 फोटो शेअर केलेत, त्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), मयंक अग्रवाल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि उमेश यादव दिसत आहेत. मात्र, भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) कुठेच दिसत नाहीय. आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी टीम इंडियाचे सर्व खेळाडू मुंबईत तीन दिवस क्वारंटाइनमध्ये होते. अलीकडेच न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) कसोटी मालिकेत टीम इंडियानं शानदार कामगिरी करत मालिका 1-0 अशी जिंकली होती. भारतीय संघासमोर आता प्रथमच दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचं आव्हान असणार आहे. उभय संघांमधील दुसरा कसोटी सामना 3 जानेवारीपासून जोहान्सबर्ग येथे, तर तिसरा आणि अंतिम कसोटी सामना 11 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे.

Indian Cricket Team
गोल्डन बॉय नीरज चोप्रा अन् चानू वर्षातील सर्वोत्तम खेळाडू

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ :

विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), प्रियांक पांचाल, रविचंद्रन अश्विन, जयंत यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.

स्टँडबाय खेळाडू : नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर आणि अर्जन नागवासवाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com