
भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील 6 क्रिकेटर ज्यांची कारकीर्द अकाली संपली
Team India: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असे काही क्रिकेटर झाले आहेत, ज्यांची क्रिकेट कारकीर्द वेळेपुर्वी संपली. प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते की आपण एकदा तरी आपल्या देशासाठी खेळलो पाहिजे. त्यापैकी फक्त काही जण जास्त काळ क्रिकेट खेळू शकतात. असे 6 भारतीय क्रिकेटपटू ज्यांना टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळाली, परंतु त्यांची कारकीर्द वेळेपूर्वीच संपले.

विनोद कांबळी- विनोद कांबळीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द केवळ 17 कसोटी सामने आणि 104 एकदिवसीय सामन्यांनंतरच संपली. 1996 च्या विश्वचषकमध्ये कोलकात्यात सुरू असलेल्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव पाहून लोकांनी मैदानात बाटल्या आणि इतर वस्तू फेकायला सुरुवात केली तेव्हा कांबळी फलंदाजी करत होता. श्रीलंकेचा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला.लंकेला विजयी घोषित करून कांबळी मैदानावरून अश्रू ढाळत पॅव्हेलियनमध्ये परतले.

भारतीय संघामध्ये षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असलेले माजी फलंदाज अतुल बेदाडे यांचे पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट फार काळ टिकू शकले नाही. अतुल बेदाडे 13 एकदिवसीय सामन्यांमध्ये केवळ 158 धावा करू शकला आणि संघाबाहेर गेला. त्यानंतर तो पुन्हा टीम इंडियात परतू शकला नाही.

व्हीआरव्ही सिंगला फलंदाजी अष्टपैलू म्हणून भारतीय संघात संधी मिळाली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड फारसा चांगला नव्हता. मात्र त्यानंतरही वेगवान गोलंदाज अष्टपैलू असल्याने त्याला संघात खेळण्याची संधी मिळाली. ज्याचा फायदा त्याला घेता आला नाही. विक्रम सिंगला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली, पण तिथेही तो चांगली कामगिरी करू शकला नाही.

वेगवान गोलंदाज सुदीप त्यागीलाही भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली होती. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्येही त्याची कामगिरी फारशी चांगली नव्हती. मात्र त्यानंतरही त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली होती. सुदीप त्यागीने भारतीय संघासाठी 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये 48 च्या सरासरीने फक्त 3 विकेट घेतल्या. तर 1 टी-20 सामन्यात त्याने 10.5 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आणि त्याच्या नावावर एकही विकेट घेतली नाही.

चेन्नई सुपर किंग्ज मधुन भारतीय संघात प्रवेश मिळवणारा आणखी एक वेगवान गोलंदाज मनप्रीत गोनी. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये त्याची कामगिरी सातत्याने चांगली राहिली नाही. मनप्रीत गोनीने भारतीय संघासाठी 2 एकदिवसीय सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने 38 च्या सरासरीने 2 विकेट घेतल्या. आयपीएलमध्ये त्याने 44 सामने खेळले आणि केवळ 37 विकेट घेतल्या. अलीकडेच त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यानंतरही त्याला माजी भारतीय खेळाडूचा टॅग मिळाला.

मन्नावा प्रसाद देखील भारतीय संघाकडून खेळला आहे, पण त्याची कामगिरी बघितली तर तो फारस काही करू शकला नाही. खराब कामगिरीनंतर पण त्याला संघात संधी मिळत राहिली. MSK प्रसाद या नावाने प्रसिद्ध असलेल्या मन्नावाने भारतासाठी 6 कसोटी सामन्यांमध्ये 11.78 च्या सरासरीने 106 धावा केल्या. त्यानंतर 17 एकदिवसीय सामन्यांमध्ये 14.56 च्या सरासरीने 131 धावा केल्या.
Web Title: India Cricketers Performance International Cricket Career Not Last Long Vinod Kambli Sports Cricket
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..