INDvsSA : आधी दमवलं आता 502 धावांवर डाव घोषित केला

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 502 धावा करुन आपला डाव घोषित केला आहे. 

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 502 धावा करुन आपला डाव घोषित केला आहे. 

भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि मयांक अगरवाल यांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांती धुलाई करत 317 धावांची विक्रमी भागीदारी रचली. या भागीदारीसह त्याने अनेक विक्रम मोडले. मात्र, त्या दोघांशिवाय भारताच्या कोणत्याही फलंदाजाला जास्त काळ मैदानावर टिकता आले आहे.

रोहित 176 धावा करुन गेल्यावर पुजारा त्याच्यापाठोपाठ लगेच सहा धावा करुन बाद झाला. कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांच्याकडून धावांची अपेक्षा असताना तेही अनुक्रमे 20,15 आणि 10 धावा करुन बाद झाला. 

यष्टीरक्षक म्हणून पदार्पण करणारा वृद्धिमान साहा 21 धावा करुन बाद झाला. अखेरच्या टप्प्यात रवींद्र जडेजाने 30 धावा केल्या आणि तो आणि अश्विन नाबाद राहिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India declares game on 502 runs against south africa in 1st test