ZIM vs IND : धवन - गिलची विक्रमी सलामी; झिम्बावे विरूद्ध भारताचा सलग 13 वा विजय

India Defeat Zimbabwe In 1st ODI Shikhar Dhawan Shubman Gill Record Opening Partnership India 13th consecutive Win Over Zimbabwe
India Defeat Zimbabwe In 1st ODI Shikhar Dhawan Shubman Gill Record Opening Partnership India 13th consecutive Win Over ZimbabweESAKAL

Zimbabwe vs India 1st ODI : भारताने झिम्बावेचे 190 धावांचे आव्हान बिनबाद पार करत तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 10 विकेट्सनी जिंकला. भारताने हे आव्हान षटकातच पार केले. शिखर धवनने नाबाद 81 धावा केल्या तर शुभमन गिलने देखील 82 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. भारताकडून दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतली. (India Defeat Zimbabwe In 1st ODI Shikhar Dhawan Shubman Gill Record Opening Partnership India 13th consecutive Win Over Zimbabwe)

भारताचा हा झिम्बावे विरूद्धचा सलग 13 वा विजय आहे. यापूर्वी भारताने 1988 ते 2004 पर्यंत बांगलादेशविरूद्ध सलग 12 सामने जिंकले होते. आता 2013 पासून 2022 पर्यंत भारताने झिम्बावे विरूद्ध सलग 13 सामने जिंकून विक्रम रचला. याचबरोबर शुभमन गिल आणि शिखर धवन यांनी वनडेमध्ये 10 विकेट्सनी विजय मिळवताना दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च सलामी दिली. यापूर्वी 1998 ला शारजाहमध्ये झिम्बावेविरूद्धच 197 धावांची सलामी दिली होती. आता 2022 मध्ये भारताने झिम्बावेविरूद्धच 192 धावांची सलामी दिली.

India Defeat Zimbabwe In 1st ODI Shikhar Dhawan Shubman Gill Record Opening Partnership India 13th consecutive Win Over Zimbabwe
Cricket Umpire : BCCI ची अंपायरिंग परीक्षेत गुगली, 140 पैकी फक्त 3 झाले पास

झिम्बावेने भारतासमोर ठेवलेल्या 190 धावांचा पाठलाग करताना सलामीवीर शुभमन गिल आणि शिखर धवन यांनी दमदार सुरूवात केली. शिखर धवनने पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय सलामीवीरांनी नाबाद शतकी सलामी दिली.

त्यानंतर शुभमन गिलने देखील आपला गिअर बदलला. त्याने आक्रमक फटेबाजी करत अर्धशतकी मजल मारली. या दोघांनी दिलेल्या नाबाद दीड शतकी सलामीच्या जोरावर भारताने मोठ्या विजयाच्या दिशेने कूच केली. अखेर भारताने झिम्बावेचे 190 धावांचे आव्हान षटकात बिनबादच पार करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली. शिखर धवनने नाबाद 81 धावा केल्या तर शुभमन गिलने नाबाद 82 धावा केल्या.

India Defeat Zimbabwe In 1st ODI Shikhar Dhawan Shubman Gill Record Opening Partnership India 13th consecutive Win Over Zimbabwe
ZIM vs IND : इव्हान्स - एनग्रावा जोडीने विक्रमी भागीदारी रचत भारताला दमवले

भारत आणि झिम्बावे यांच्यातील पहिल्या सामन्यात केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवत दुबळ्या झिम्बावेचा डाव झटपट संपवण्यास सुरूवात देखील केली. मात्र भारतीय गोलंदाजांचे हे मनसुबे झिम्बावेच्या ब्राड इव्हान्स आणि रिचर्ड एनग्रावा यांनी उधळून लावले. या दोघांनी नवव्या विकेटसाठी विक्रमी 70 धावांची भागीदारी रचली. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच भारताविरूद्ध झिम्बावेच्या जोडीने नवव्या विकेटसाठी इतकी मोठी भागीदारी रचली.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेंडू चांगला स्विंग होत होता. त्यामुळे भारतीय संघ झिम्बावेला झटपट गुंडळणार असे वटात होते. झिम्बावेने सावध सुरूवात केली खरी मात्र दीपक चाहर, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी भेदक मारा करत झिम्बावेची अवस्था 8 बाद 110 धावा अशी केली होती. झिम्बावेचा कर्णधार रेगिस चकाब्वाची झुंजार फलंदाजी करत संघाला शतकी मजल मारून दिली होती. त्याने 35 धावांचे योगदान दिले.तो

तो बाद झाल्यानंतर भारत झिम्बावेला गुंडाळून सामना लवकर संपवले असे वाटत असतानाच ब्राड इव्हान्स आणि रिचर्ड एनग्रावा यांनी नवव्या विकेटसाठी झुंजार 70 धावांची भागीदारी रचली. भारताविरूद्धची झिम्बावेची ही नवव्या विकेटसाठीची सर्वात मोठी भागीदारी ठरली. अखेर प्रसिद्ध कृष्णाने एनग्रावाला 34 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. ब्राड इव्हान्सने नाबाद 29 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. भारताकडून दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com