IND vs SL : कॅप्टन हार्दिक पांड्याने वानखेडेवर रचला इतिहास; डिफेंड करण्यात ठरला टायगर

IND vs SL Hardik Pandya
IND vs SL Hardik Pandyaesakal

IND vs SL Hardik Pandya : भारताने शेवटच्या चेंडूवर श्रीलंकेचा 2 धावांनी पराभव करत मालिकेतील पहिला टी 20 सामना आपल्या खिशात टाकला. भारताने या विजयाबरोबरच नव्या वर्षाची सुरूवात विजयाने केली. विशेष म्हणजे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ज्या मैदानावर धावांचा पाऊस पडतो अन् सामना हा कामय चेस करणारी टीमच जिंकते अशा वानखेडे स्टेडियमवर अवघ्या 162 धावा डिफेंड केल्या.

यापूर्वी वानखेडेवर प्रथम फलंदाजी करत 2016 मध्ये दक्षिण आफ्रिका विरूद्ध अफगाणिस्तान सामन्यात 206 धावा डिफेंड करण्यात आल्या होत्या. त्यानंतर 2019 मध्ये भारत वेस्ट इंडीज सामन्यात 240 धावा डिफेंड झाल्या होत्या. मात्र या दोन्ही धावसंख्या 200 पारच्या होत्या. मात्र आजच्या सामन्यात भारताने वानखेडेवर 162 धावा डिफेंड केल्या. त्यांनी श्रीलंकेला 160 धावात रोखत सामना 2 धावांनी जिंकला.

IND vs SL Hardik Pandya
IND vs SL : w,w,w,w शिवमची सुंदरम कामगिरी तर अक्षरने खेचून आणला शेवटच्या चेंडूवर नव्या वर्षातला पहिला विजय

अक्षर पटेलने अखेरच्या चेंडूवर फक्त 1 धाव दिल्यामुळे भारताने सामना अवघ्या 2 धावांनी जिंकत नव्या वर्षाची सुरूवात विजयाने केली. भारताने श्रीलंकेसमोर 163 धावांचे आव्हान ठेवले होते. लंकेला 160 धावा करता आल्या. भारताकडून शिवम मावीने प्रभावी मारा करत 4 षटकात 22 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.

भारताकडून उमरान मलिकनेही मोक्याच्या क्षणी विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने लंकेचा झुंजार कर्णधार शानकाला 45 धावांवर बाद केले. तेथूनच भारताने सामन्यावर पकड मजबूत केली.

फलंदाजीत भारताकडून दीपक हुड्डाने नाबाद 41 धावांची झुंजार खेळी केली. त्याला अक्षर पटेलने नाबाद 31 धावा करत चांगली साथ दिली होती. त्यामुळेच भारतीय संघ 5 बाद 94 वरून 20 षटकात 5 बाद 162 धावा करू शकला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 35 चेंडूत नाबाद 68 धावांची भागीदारी रचली.

IND vs SL Hardik Pandya
IND vs SL : दीपक हुड्डाचा झंजावात; भारताची शेवटच्या 5 षटकात वाचली लाज

तत्पूर्वी, श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्याच सामन्यात भारताची अवस्था 5 बाद 94 धावा अशी झाली असताना दीपक हुड्डाने (नाबाद 41 धावा) झुंजार खेळी करत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. त्याने अक्षर पटेलच्या (नाबाद 31 धावा) साथीने सहाव्या विकेटसाठी 35 चेंडूत नाबाद 68 धावांची धडाकेबाज भागीदारी रचली. यामुळे 15 व्या षटकात 5 बाद 94 अशी अवस्था झालेल्या भारताने 20 षटकात 5 बाद 162 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून इशान किशननेही 37 तर कर्णधार हार्दिक पांड्याने 29 धावांचे योगदान दिले.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com