

Team India players during practice session ahead of the T20 World Cup clash against Netherlands.
Sakal
-सुनंदन लेले
अहमदाबाद: टी-२० विश्वचषक चालू झाल्यावर पटापट सामने पार पडले आणि साखळी फेरीतला भारताचा शेवटचा सामना जवळ आला. भारत वि. नेदरलँड्स सामना म्हटल्यावर खूप उत्साह वाटत नाही. भारतीय संघाचा सध्याचा विजयी धडाका बघितला, तर बुधवारचा सामना कठीण जाईल, असे वाटत नाही. तरीही भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीत समोरच्या संघाला ना कमी लेखेल, ना तयारीत किंवा एकाग्रतेत बाधा आणेल. थोडक्यात शेवटचा सामना जिंकून सुपर-८ फेरीत ताठ मानेने जायची औपचारिकता भारतीय संघ गांभीर्याने पूर्ण करणार आहे.