बीजिंग : जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला व पॅरालिंपिक विजेता हरविंदर सिंग याने दोन सुवर्णपदकांची कमाई करताना पॅरा आशियाई अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेमध्ये भारतासाठी मोलाची कामगिरी केली..भारताने या स्पर्धेमध्ये तीन सुवर्ण, तीन रौप्य व तीन ब्राँझ अशी एकूण नऊ पदकांवर मोहर उमटवत पदकतालिकेत दुसरे स्थान पटकावले. चीनच्या संघाने दहा सुवर्ण, चार रौप्य व तीन ब्राँझ असे एकूण सतरा पदकांवर नाव कोरत पहिल्या स्थानावर झेप घेतली..हरविंदर सिंग याने पुरुष विभागातील रिकर्व्ह प्रकारातील ६६३ गुणांची कमाई केली. ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी होय. तसेच या स्पर्धेतील विक्रमही त्याने आपल्या नावावर केला. हरविंदर याने भावना हिच्या साथीने मिश्र प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तसेच पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावताना डबल धमाका केला. हरविंदर-भावना या जोडीने चीनच्या झिहान गाओ-जुन गॅन या जोडीचा ५-४ असा पराभव करीत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात हरविंदर याने अंतिम फेरीत थायलंडच्या हॅनरेयुचेई नेटसिरी याला ७-१ असे सहज पराभूत केले व पहिल्या स्थानावर मुसंडी मारली..हरविंदरला पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारातील दुहेरीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. हरविंदर-विवेक चिकारा या भारतीय जोडीला चीनच्या जोडीकडून ५-४ अशी हार पत्करावी लागली. हरविंदरचे हे या स्पर्धेतील तिसरे पदक होय..महिलांच्या कंपाउंड प्रकारात बाजीमहिलांच्या कंपाउंड प्रकारात भारतीय खेळाडूंनी बाजी मारली. शीतल देवी व ज्योती या जोडीने चीनच्या लू झँग-जिंग झाओ या जोडीचा १४८-१४३ असा पराभव करताना भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. राकेशकुमार-शामसुंदर स्वामी या जोडीने रौप्यपदक पटकावले. राकेशकुमार-ज्योती या जोडीला मिश्र प्रकारामध्ये रौप्यपदक मिळाले..Wimbledon 2025: जोकोविच, सिनरचे एकेरीत शानदार विजय; विम्बल्डन ग्रँडस्लॅम, गतविजेत्या बार्बोरा क्रेझीकोव्हाला पराभवाचा धक्का.तीन ब्राँझपदकेभारतीय खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये तीन ब्राँझपदके पटकावली. महिलांच्या रिकर्व्ह प्रकारातील दुहेरीत पूजा व भावना या जोडीला ब्राँझपदक मिळाले. नवीन दलाल व नुरुद्दीन या जोडीला पुरुषांच्या दुहेरीत ब्राँझपदकाची कमाई करता आली. महिलांच्या कंपाउंड प्रकारात ज्योती हिने भारताला तिसरे ब्राँझपदक मिळवून दिले. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये संस्मरणीय यश मिळवले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.