

Sports News
esakal
निंगबो: चीनमध्ये उद्यापासून (ता. ७) आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेमध्ये भारताची मदार पुन्हा एकदा लक्ष्य सेन व पी. व्ही. सिंधू हिच्या खांद्यावर असणार आहे. १९६५ नंतर भारतीय बॅडमिंटनपटूला एकेरी विभागात अद्याप जेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही. दिनेश खन्ना यांनी १९६५ मध्ये भारताला पुरुष एकेरीमध्ये अखेरचे सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्यानंतर अद्याप भारतीय खेळाडूंना पुरुष व महिला अशा दोन्ही विभागातील एकेरीमध्ये अजिंक्यपदावर मोहर उमटवता आलेली नाही. दरम्यान, सात्त्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या जोडीने दुखापतीमुळे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमधून माघार घेतली आहे.