U19 Asia Cup : केवळ 106 धावा करुनही भारताने जिंकली फायनल!

वृत्तसंस्था
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

भारतीय संघाने 19 वर्षांखालील आशिया करंडक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध झालेल्या अतिंम सामन्यात केवळ 106 धावा केल्या आणि तरीही अंतिम सामन्यात विजय मिळवला. 

कोलंबो : भारतीय संघाने 19 वर्षांखालील आशिया करंडक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध झालेल्या अतिंम सामन्यात केवळ 106 धावा केल्या आणि तरीही अंतिम सामन्यात विजय मिळवला. 

INDvsSA : हा सलामीवीर खोऱ्यानं धावा करतोय तरी रोहितलाच संधी का?

106 धावांचा पाठलाग करताना बांगलेदशचीही अवस्था वाईट झाली. मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्याचा मुलगा असलेल्या अर्थव अंकोळेकरने पाच फलंदाजांना माघारी धाडले तर राजस्थानचा मध्यमगती गोलंदाज आकाश सिंगने  तीन फलंदाजांना बाद करत संघाचा विजयाचा मार्ग मोकळा केला.   

उपांत्य फेरीच्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे गटातील अव्वल भारत आणि बांगलादेश यांना अंतिम फेरीत प्रवेश मिळाला. अंतिम सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारताला केवळ 106 धावा करता आल्या. तरीही भारताने बांगलादेशविरुद्ध 33व्या षटकातच विजय मिळवला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India lost against Bangladesh in U19 Asia Cup finals