Hardik Pandya : टीम इंडियासाठी हार्दिक पांड्या पुढचा धोनी ठरतोय का ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hardik Pandya

Hardik Pandya : टीम इंडियासाठी हार्दिक पांड्या पुढचा धोनी ठरतोय का ?

Asia Cup Hardik Pandya : आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान अष्टपैलू हार्दिक पांड्यामध्ये एमएस धोनीची झलक पाहिला मिळाली. पाकिस्तानसोबतच्या या सामन्यात हार्दिक पांड्याने मोहम्मद नवाजच्या चेंडूवर षटकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. फिनिशर म्हणून हार्दिक पांड्याची तुलना महेंद्रसिंग धोनीशी केल्या जाता आहे. 28 वर्षीय हार्दिक पांड्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला.

हेही वाचा: Ind vs Pak Asia Cup 2022 : आशिया चषकमध्ये पुन्हा भिडणार भारत-पाक; जाणून घ्या कसे

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पांड्या 6 व्या क्रमांकावर फलंदाजीला येतो आणि आता तो धोनीप्रमाणे फिनिशरची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. धोनीच्या कर्णधारपदातील शांत स्वभावाची तुलना हार्दिक पांड्याशी केली जाते. एका मुलाखतीदरम्यान, पांड्याने मी माही भाईकडून शांत स्वभाव शिकलो असल्याचे म्हटले होते. मी नेहमी शांतपणे विचार केला आहे आणि हे माझ्यासाठी जीवनात तसेच क्रिकेटच्या मैदानावर महत्त्वाचे आहे. असेही पांड्याने यावेळी सांगितले होते.

महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पांड्या चांगले मित्र आहेत. एक क्रिकेटर म्हणून हार्दिकला माहीची खूप मदत झाली आहे. पांड्याने 2016 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 2021 च्या T20 विश्वचषकापासून हार्दिक पांड्या संघाबाहेर होता, पण तो IPL 2022 च्या माध्यमातून क्रिकेटच्या जगात परतला आणि तेव्हापासून तो मजबूत फॉर्ममध्ये आहे.

हेही वाचा: Video : धोनी स्टाईलमध्ये सामना संपल्यानंतर हार्दिक म्हणाला, माही भाईकडून...

हार्दिक पांड्या या खेळाडूच्या रूपाने टीम इंडियाला एमएस धोनी फिनिशर मिळाला आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. अनेक महिन्यांपासून भारतीय संघात अशाच फिनिशरचा शोध घेतला जात होता. खरतंर फिनिशरच्या या भूमिकेत हार्दिक नंतर दिनेश कार्तिक, दीपक हुडा वॉशिंग्टन सुंदर यांची नावे चर्चेत होती. मात्र, क्रिकेट जगतात हार्दिकच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे. जसजसे आम्ही पुढे जाऊ तसतसे आम्ही त्याचे मूल्यांकन करत राहू. पण सध्या संघ त्याच्याकडे एक फलंदाज म्हणून पाहील जो एमएस धोनीसारख्या फिनिशरची भूमिका बजावतो.

Web Title: India Pakistan Asia Cup T20 Match Last Ball Sixer Hardik Pandya Is Becoming Next Mahendra Singh Dhoni

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..