Asia Cup 2023: आशिया कपबाबत जय शहांची मोठी घोषणा! भारत-पाकिस्तान आता...

ind vs pak Asia Cup 2023 Jay Shah
ind vs pak Asia Cup 2023 Jay Shahsakal

Asia Cup 2023 Jay Shah : आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा यांनी 2023 आणि 2024 मध्ये होणाऱ्या स्पर्धांची यादी जाहीर केली आहे. या यादीत चाहत्यांची पहिली नजर पाकिस्तानात होणाऱ्या आशिया कप 2023 वर पडली. जय शहा यांच्या ट्विटनुसार, सप्टेंबरमध्ये आशिया कप एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळल्या जाणार आहे.

भारत आणि पाकिस्तान संघ ज्यामध्ये एकाच गटात असणार आहे, तर दुसरा गट गतविजेता श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश आहे. मात्र आशिया चषक पाकिस्तानात होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पाकिस्तान अधिकृतपणे या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे, परंतु BCCI सचिव असल्याने, जय शहा यांनी आधीच स्पष्ट केले आहे की टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही.

ind vs pak Asia Cup 2023 Jay Shah
IND vs NZ : पराभवानंतर टीम इंडियात होणार बदल! कॅप्टन धवन 'या' खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता ?

जय शहा यांनी ट्विट केले की, '2023 आणि 2024 साठी ACC स्ट्रक्चर आणि क्रिकेट कॅलेंडर सादर करत आहे. या खेळाला नवीन उंचीवर नेण्यासाठी आमचे प्रयत्न दिसून येतील. विविध देशांतील क्रिकेटपटू एक नेत्रदीपक कार्यक्रम सादर करण्याच्या तयारीत असल्याने, क्रिकेटसाठी हा उत्तम काळ असेल. आशिया चषक 2023 मध्ये लीग टप्पा सुपर-4 आणि फायनल असे एकूण 13 सामने खेळले जाणार आहे. जरी या स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

ind vs pak Asia Cup 2023 Jay Shah
IND vs SL: टीम इंडिया तीन वर्षांनंतर पुण्यात खेळणार टी-20 सामना; घरबसल्या येथे पहा 'फ्री'

टी-20 विश्वचषक 2022 च्या आधी जय शहाने स्पष्ट केले होते की, भारतीय संघ आशिया कपसाठी पाकिस्तानला जाणार नाही. बीसीसीआय सचिवाच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकिस्तान बहुराष्ट्रीय स्पर्धेत प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणार असून स्पर्धेपूर्वीचे हे विधान यजमानांसाठी मोठा धक्का आहे.

जय शहा यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानकडून अशीही विधाने आली होती की, जर भारत या स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये आला नाही तर त्यांचा संघ 2023 च्या विश्वचषकासाठी भारतात जाणार नाही. 2008 पासून भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला गेलेला नाही. 2008 च्या आशिया चषकासाठी भारतीय संघ शेवटच्या वेळी पाकिस्तानला गेला होता. दोन्ही देशांमधील खराब राजकीय संबंधांमुळे अनेक दिवसांपासून द्विपक्षीय मालिका खेळल्या जात नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com