FIFA Ranking : फिफा क्रमवारीत १२१वे स्थान ; भारतीय फुटबॉल संघाची घसरण

विश्‍वकरंडक पात्रता फेरीत अफगाणिस्तानविरुद्ध २-१ असा लाजिरवाणा पराभव सहन करावा लागल्यानंतर आता भारतीय फुटबॉल संघाची फिफा क्रमवारीत घसरण झाली आहे. भारतीय संघ ११७व्या स्थानावरून १२१व्या स्थानावर पोहोचला आहे.
FIFA Ranking
FIFA Rankingsakal

नवी दिल्ली : विश्‍वकरंडक पात्रता फेरीत अफगाणिस्तानविरुद्ध २-१ असा लाजिरवाणा पराभव सहन करावा लागल्यानंतर आता भारतीय फुटबॉल संघाची फिफा क्रमवारीत घसरण झाली आहे. भारतीय संघ ११७व्या स्थानावरून १२१व्या स्थानावर पोहोचला आहे.

इगोर स्टिमॅक यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने मागील वर्षी उल्लेखनीय कामगिरी केली होती. आंतरखंडीय, तिरंगी मालिका व सॅफ या स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने केला होता. त्यामुळे भारतीय संघ १००च्या आत क्रमवारीत पोहोचला होता. एएफसी आशियाई करंडकातही भारताकडून सुमार कामगिरी झाली. सर्व लढतींमध्ये भारताचा पराभव झाला. त्यामुळे भारतीय संघाची ११७व्या स्थानावर घसरण झाली.

स्टिमॅकच प्रशिक्षक

भारतीय संघाची क्रमवारीत घसरण झाल्यामुळे इगोर स्टिमॅक यांना प्रशिक्षकपदावरून काढून टाकणार, अशी चर्चा रंगू लागली होती; पण फिफा जागतिक स्पर्धेच्या पात्रता फेरीतील कुवेत व कतार विरुद्धच्या लढतींसाठी त्यांच्याकडेच भारतीय संघाचे प्रशिक्षकपद कायम ठेवण्यात आले आहे. अखिल भारतीय फुटबॉल संघटनेकडून गुरुवारी याबाबतची घोषणा करण्यात आली.

फिफा ताजा क्रमवारी (अव्वल दहा) : १) अर्जेंटिना, २) फ्रान्स, ३) बेल्जियम, ४) इंग्लंड, ५) ब्राझील, ६) पोर्तुगाल, ७) नेदरलॅंड, ८) स्पेन, ९) इटली, १०) क्रोएशिया.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com