BWF World Championships Saina Nehwal
BWF World Championships Saina Nehwalsakal

BWF World Championships : सायना नेहवाल बाहेर; कपिला-अर्जुन, सात्विक-चिराग जोडी उपांत्यपूर्व फेरीत

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल महिला एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये कडवे आव्हान पेलल्यानंतर बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून बाहेर
Published on

BWF World Championships : ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल महिला एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये कडवे आव्हान पेलल्यानंतर बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून बाहेर पडली आहे. सायना नेहवालला थायलंडच्या प्रतिस्पर्ध्याकडून 17-21, 21-16 आणि 13-21 असा पराभव पत्करावा लागला. या विजयासह बुसाननचा सायनाविरुद्धचा विजयी विक्रम 5-3 वर गेला आहे. भारतीय पुरुष दुहेरीच्या जोडीला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले. ध्रुव कपिला व अर्जुन आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीने पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.

BWF World Championships Saina Nehwal
T20 World Cup : मैदानात उभे राहूनही पाहू शकता IND vs PAK सामना; जाणून घ्या किंमत

बुसाननने सुरुवातीच्या गेममध्ये 11-3 अशी आघाडी घेत सायनाला दडपणाखाली ठेवले. तिसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना कडवी टक्कर दिली. पण बुसाननने वेग पकडला आणि पाच गुणांची आघाडी घेतली. दुसरीकडे, सायना मागे राहिली आणि 26 वर्षीय बुसाननने सात मॅच पॉइंटसह आपले उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले.

अर्जुन आणि कपिला या बिगरमानांकित जोडीने 58 मिनिटांच्या रोमहर्षक लढतीत सिंगापूरच्या टेरी ही आणि लोह कीन हीन यांचा 18-21, 21-15, 21-16 पराभव केला. सात्विक आणि चिराग या जोडीने डेन्मार्कच्या जेप्पा बे आणि लासे मोल्हेडे यांचा 35 मिनिटांत 21-12, 21-10 असा पराभव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com