INDvsSA : भारताची आक्रमक सुरवात; आफ्रिकेचे गोलंदाज फेल

बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

कसोटी सामन्यात सलामीला फलंदाजी करायला दिल्याची संधी रोहित शर्माने अचूक साधली आणि भारतीय सलामीच्या जोडीने पहिल्या दिवशी उपहाराला बिनबाद 91 धावा फलकावर लावून संघाला झकास सुरुवात करून दिली.

विशाखापट्टणम : कसोटी सामन्यात सलामीला फलंदाजी करायला दिल्याची संधी रोहित शर्माने अचूक साधली आणि भारतीय सलामीच्या जोडीने पहिल्या दिवशी उपहाराला बिनबाद 91 धावा फलकावर लावून संघाला झकास सुरुवात करून दिली.

INDvsSA : रोहित, भावा कसोटीतही तूच एक नंबर!

नाणेफेकीचा कौल विराट कोहलीच्या बाजूने लागल्यावरच फाफ डु प्लेसिसच्या कपाळावर आठ्यांचे जाळे दिसले. कोहलीने अर्थातच प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. एका बाजूने रबाडा आणि दुसर्‍या बाजूने फिलेंडर असा मारा चालू करून दक्षिण आफ्रिकेने ताज्या खेळपट्टीचा फायदा घ्यायचा माफक प्रयत्न केला. मयांक आगरवाल आणि रोहित शर्मा जोडीने नवा चेंडू आरामात खेळून काढल्यावर 9व्या षटकातच डु प्लेसिसने केशव महाराजची फिरकी गोलंदाजी चालू केली.

एव्हाना जम बसलेल्या रोहित शर्माने मग बेधडक फटकेबाजी केली. फिरकी गोलंदाजांना पुढे सरसावत रोहितने उत्तुंग षटकार मारत अर्धशतक साजरे केले. समोरून मयांक आगरवालने भक्कम फलंदाजी करून गोलंदाजांना यशापासून लांब ठेवले.

आयपीएलपर्यंत भारताचा 'हा' प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे टीम इंडियाबाहेर

हाती असलेल्या पाच गोलंदाजांना गोलंदाजी करायची संधी फाफ डु प्लेसिसने दिली. दोनही भारतीय फलंदाजांनी चांगल्या चेंडूंना मान दिला तर खराब चेंडूंवर चौकार - षटकार मारले. उपहाराला मयांक  आगरवाल (नाबाद 39 धावा)- रोहित शर्मा (नाबाद 52 धावा) फलकावर 91 धावा लावून नाबाद परतले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India scores 91 runs before lunch in 1st test against south africa