
बँकॉक : भारताच्या खेळाडूंनी आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये ठसा उमटवला. १९ वर्षांखालील स्पर्धेमध्ये एकूण १४ पदकांची माळ आपल्या गळ्यात घातल्यानंतर भारतीय खेळाडूंनी २२ वर्षांखालील स्पर्धेमध्ये १३ पदके आपल्या नावावर केली. २२ वर्षांखालील स्पर्धेत भारताने चौथा क्रमांक पटकावला.