Asian Shooting Championship: विक्रमासह अंकुर मित्तलला सुवर्ण; आशियाई नेमबाजी स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंचे वर्चस्व कायम
Ankur Mittal: कझाकस्तानच्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी कमालीचा पराक्रम केला. अंकुर मित्तल आणि अनुष्का सिंग यांच्यासह भारताने अनेक पदके जिंकली.
नवी दिल्ली : भारतीय नेमबाजांचे आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील वर्चस्व शुक्रवारीही कायम राहिले. अंकुर मित्तल याने डबल ट्रॅप प्रकारात आशियाई विक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी घातली. कझाकस्तान येथे ही प्रतिष्ठेची स्पर्धा सुरू आहे.