Sports News: पलक-मुकेश नेलावल्ली यांची विश्वविक्रमासह सुवर्ण झेप; भारताचा अभिमान उंचावला

Palak and Mukesh Shine in Final: नेमबाजी विश्वकरंडकात भारताच्या पलक आणि मुकेश नेलावल्ली जोडीने विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला.
Sports News

Sports News

esakal

Updated on

नवी दिल्ली: भारताच्या पलक व मुकेश नेलावल्ली या जोडीने नेमबाजी विश्वकरंडकात विश्वविक्रमासह सुवर्णपदकावर मोहर उमटवली. पलक व मुकेश या जोडीने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात चीनच्या हू केई-कियानशून या विश्वविजेत्या जोडीला पराभूत करताना सुवर्णपदकावर हक्क सांगितला. चीनच्या जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. हंगेरीच्या वेरोनिका मेजर-ॲकोस कॅरोली नॅगी या जोडीने ब्राँझपदकाची कमाई केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com