BCCI ने 'या' तीन खेळाडूंशी चालवलाय सावत्रपणा, घ्यावी लागणार निवृत्ती?

तीन दिग्गज खेळाडू आहेत ज्यांना एक वर्षापासून टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळत नाही.
india star player ajinkya rahane wriddhiman saha ishant sharma career may get in team sports cricket kgm00
india star player ajinkya rahane wriddhiman saha ishant sharma career may get in team sports cricket kgm00SAKAL

Team India : टीम इंडियाच्या कर्णधारापासून ते प्रशिक्षकापर्यंत गेल्या वर्षभरात खूप काही बदलले दिसत आहे. टीम इंडियाच्या भविष्याचा विचार करत संघातील अनेक युवा खेळाडूंना संधी दिली जात आहे. अशा परिस्थितीत 3 दिग्गज खेळाडू आहेत ज्यांना एक वर्षापासून टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळत नाही, या खेळाडूंची कारकीर्द आता जवळपास संपली आहे.

india star player ajinkya rahane wriddhiman saha ishant sharma career may get in team sports cricket kgm00
बीडच्या तरुणाची वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी हुकली

अजिंक्य रहाणे आता खराब फॉर्म आणि दुखापतीशी झुंज देत आहे. बऱ्याच दिवसांपासून त्याच्या बॅटमधून धावाही निघालेल्या नाहीत. रहाणे आयपीएल 2022 मध्येही फ्लॉप ठरला होता, त्यानंतर संघात परतणे त्याच्यासाठी कठीण झाले. अजिंक्य रहाणेने भारतीय संघासाठी 82 कसोटी सामन्यांमध्ये 12 शतकांसह 4931 धावा केल्या आहेत.

यष्टिरक्षक म्हणून सर्व फॉरमॅटमध्ये ऋषभ पंत टीम इंडियाची पहिली पसंती बनला आहे. अशा स्थितीत यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाला संघात स्थान मिळणे अशक्य आहे. 2010 मध्ये त्याने भारतासाठी पदार्पण केले होते, परंतु तो कधीही आपल्या संघात कायमस्वरूपी स्थान मिळवू शकला नाही.

भारताकडून 105 कसोटी सामने खेळणारा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा बऱ्याच काळापासून संघाचा भाग नाही. नोव्हेंबर 2021 मध्ये त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. खराब फॉर्म आणि फिटनेसमुळे इशांत शर्माला टीम इंडियातून वगळण्यात आले होते. आता इशांत शर्माचे संघात पुनरागमन करणे कठीण दिसत आहे. त्याच्या जागी मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णासारख्या वेगवान गोलंदाजांना संघात संधी मिळाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com