India Test Captain : कोहलीचा कोच निघाला रोहितचा फॅन

Virat-Kohli-Rohit-Sharma-
Virat-Kohli-Rohit-Sharma-File Photo

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर विराट कोहलीनं (Virat Kohli) कसोटी संघाचे नेतृत्व (Team India Test Captaincy) सोडण्याचा निर्णय घेतला. किंग कोहलीच्या या निर्णयानंतर भारतीय कसोटी संघासाठी (Team India) नव्या कॅप्टन्सीचा शोध सुरु झाला आहे. यासाठी अनेक नावे चर्चेत असताना विराट कोहलीचे लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma ) यांनी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावाला समर्थन दिले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघ सर्वोच्च पातळीवर कामगिरी करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

रोहितला टेस्ट कॅप्टन्सीची पसंती देताना काय म्हणाले किंग कोहलीचे कोच

सध्याच्या घडीला भारतीय कसोटी संघाच्या कॅप्टन्सीच्या शर्यतीत रोहित शर्मासोबतच (Rohit Sharma) लोकेश राहुलचेही (KL Rahul) नाव आहे. यासंदर्भात एका मुलाखतीमध्ये विराट कोहलीला क्रिकेटचे धडे देणारे कोच राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma) म्हणाले की, 'विराट कोहलीच्या जागेसाठी रोहित शिवाय दुसरा कोणताही उत्तम पर्याय सध्याच्या घडीला उपलब्ध नाही, असे माझे वैयक्तिक मत आहे. रोहित शर्मा हा असा खेळाडू आहे ज्याचे कसोटी संघातील स्थान पक्के आहे. त्याच्याशिवाय टीम इंडिया मैदानात उतरु शकत नाही. त्यामुळे तोच कसोटी संघाच्या नेतृत्वासाठी उत्तम पर्याय वाटतो. ज्या ज्या वेळी त्याला कॅप्टन्सीची संधी मिळाली आहे त्या त्या वेळी त्याने आपल्यातील नेतृत्वाचे कौशल्य दाखवले आहे. आयपीएलमधील तो एक यशस्वी कर्णधार आहे, असेही ते म्हणाले.

Virat-Kohli-Rohit-Sharma-
VIDEO : सुरेख यॉर्करवर चेंडूनं स्टंम्पला किस तर केलं, पण...

कोहलीचे माजी कोच राजकुमार शर्मा यांनी वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघावरही भाष्य केले. प्रत्येक कॅप्टन आपल्या पसंतीनुसार खेळाडूला खेळवण्यावर भर देतो. राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांच्यात पसंतीमध्ये साम्य असेल तर निवड समितीनं त्यांना हवी ती टीम द्यायला हवी, असे ते म्हणाले. वेस्ट इंडीज विरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात युवा खेळाडूंना अधिक संधी देण्यात आली आहे. याचेच त्यांनी समर्थन केले आहे.

Virat-Kohli-Rohit-Sharma-
आशियाई स्पर्धेत विश्वनाथन आनंद असणार मेंटॉरच्या भुमिकेत

विराट कोहलीनं कसोटी संघाचे कर्णधार सोडल्यानंतर संघाच्या नव्या कर्णधाराच्या शर्यतीत रोहित शर्मासह लोकेश राहुलचे नावही चर्चेत आहे. मास्टर ब्लास्टर सुनील गावसकर यांनी तर पंतला कर्णधार करावे, असे मत व्यक्त केले आहे. या सर्व नावात रोहित शर्मा आघाडीवर आहे. भारतीय क्रिकेटमध्ये स्प्लिट कॅप्टन्सीला आधीपासूनच विरोध होता. कोहलीनं टी-20 संघाचे कर्णधार सोडल्यानंतर त्याला वनडेच्या कर्णधार पदावरुन हटवून बीसीसीआयच्या निवड समितीने स्प्लिट कॅप्टन्सीवर भरवसा दाखवण्याचे संकेत दिले होते. पण आता पुन्हा भारतीय क्रिकेट वन मॅन रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com