India Tour Sri Lanka : मोठी घोषणा! टी-20 वर्ल्ड कप 2024 नंतर टीम इंडिया जाणार 'या' देशाच्या दौऱ्यावर

India to tour Sri Lanka in July-August 2024
India to tour Sri Lanka in July-August 2024

India to tour Sri Lanka July-August 2024 : भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. जिथे भारताला तीन वनडे, तीन टी-२० आणि दोन कसोटी सामने खेळायचे आहेत.

मग जानेवारी भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. तर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर सर्व खेळाडू इंडियन प्रीमियर लीगमध्ये सहभागी होतील. ते झाले की, भारतीय संघाला 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप खेळायचा आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया कोणाता दौरा करणार आहे, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

India to tour Sri Lanka in July-August 2024
Asia Cup : गरीब पाकिस्तान! म्हणे विमान प्रवासाचा खर्च द्या... जय शहांच्या अध्यक्षतेखालील ACC म्हणतं वाट बघा

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने 2024 साठी आपल्या संघाचे आंतरराष्ट्रीय कॅलेंडर जाहीर केले आहे, ज्यामध्ये श्रीलंकेचा संघ वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळल्या जाणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपनंतर भारताविरुद्ध मालिका खेळणार आहे.

टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या सामन्यांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.

श्रीलंका क्रिकेट संघ पुढील वर्षी झिम्बाब्वे, अफगाणिस्तान, भारत, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजचे यजमानपद भूषवणार आहे. त्यात न्यूझीलंडचा संघ दोनदा श्रीलंकेचा दौरा करणार आहे. श्रीलंका क्रिकेट संघ बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामने, इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी सामने आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. म्हणजेच श्रीलंकेचा संघ एकूण 10 कसोटी, 21 एकदिवसीय आणि 18 टी-20 सामने खेळणार आहे. यात टी-20 वर्ल्ड कप सामन्यांचा समावेश नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com