टीम इंडियासाठी कायपण! आफ्रिका बोर्डानं उचललं मोठं पाऊल

Team India
Team IndiaSakal

भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी (India Tour of South 2021-22) आता आठवड्याभराहून कमी कालावधी उरला आहे. भारतीय संघ 15 किंवा 16 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार असल्याची चर्चा आहे. मुंबईहून संघ दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होईल. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची (Covid-19 Omicron Variant) दहशत निर्माण झाली असताना बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेतील नियोजित मालिका खेळण्याची तयारी दर्शवली. यासाठी घातलेल्या अटींची पूर्तता करण्यासाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने कंबर कसली आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर येणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर बोर्डाने मोंठ पाऊल उचललं आहे. ओमिक्रॉनपासून सुरक्षिततेसाठी बायोबबलचे वातावरण तयार करण्यात आले असून या दौऱ्यावर भारतीय संघाच्या वास्तव्यासाठी संपूर्ण हॉटेलच बूक करण्यात आले आहे.

Team India
शास्त्रींना आठवल्या चुका; थ्रीडी मॅनवरही झाला होता अन्याय

26 डिसेंबरला भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) बॉक्सिंग डे टेस्‍टनं (Boxing Day Test) भारतीय संघाच्या दौऱ्याला सुरुवात होईल. या दौऱ्यावर कसोटी संघाचे नेतृत्व हे विराट कोहलीकडे असणार आहे. दुसरीकडे वनडे संघात खांदे पालट झाल्याचे पाहायला मिळणार आहे. कोहलीच्या जागी भारतीय संघाच्या वनडेचे नेतृत्व रोहित शर्माकडे (Rohit Sharma) देण्यात आले आहे.

Team India
रोहित कॅप्टन झाल्यावर अझरुद्दीनचा आनंद गगनात मावेना! म्हणाला...

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेत मर्यादित प्रेक्षकांना स्टेडियमध्ये प्रवेश देण्याबाबतही विचार सुरु आहे. यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती आफ्रिका क्रिकेट बोर्डाकडून देण्यात आलेली नाही. यापूर्वी 2017-18 मध्ये भारतीय संघाने आफ्रिकेचा दौरा केला होता. यावेळी भारतीय संघाने तीन सामन्यांची कसोटी मालिका 1-2 अशी गमावली होती. विराट अॅण्ड कंपनी या पराभवाची परतफेड करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com