India Tour of South Africa : रोहित शर्माकडे मोठी जबाबदारी?

रहाणेचे उपकर्णधार पद धोक्यात; रोहित घेणार जागा?
Ajinkya Rahane Rohit Sharma
Ajinkya Rahane Rohit Sharmaesakal

मुंबई : बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौरा करणार असल्याची माहिती दिली. या दौऱ्यावर भारतीय संघ तीन कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. दरम्यान, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने एनडी टीव्हीला दिलेल्या माहितीनुसार भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्या खराब फॉर्मवर बीसीसीआय निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Ajinkya Rahane Rohit Sharma
भारताचा आफ्रिका दौरा कन्फर्म; जय शहांनी तारीख ठेवली गुलदस्त्यात

बीसीसीआयच्या अधिकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अजिंक्य रहाणेकडून कसोटी संघाचे उपकर्णधारपद काढून घेण्याची दाट शक्यता आहे. भारतीय कसोटी संघाचे उपकर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्याबाबत चर्चा सुरु झाली आहे. आजच्या बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेत भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौरा टाळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र अजून दौऱ्याची तारीख स्पष्ट झालेली नाही.

सध्या न्यूझीलंड विरुद्धची दुसरी कसोटी वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. या निर्णायक कसोटीत संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला दुखापतीचे कारण देऊन संघातून वगळण्यात आले आहे. त्यानंतर रहाणेच्या कसोटी कारकिर्दिवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आता बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संघ व्यवस्थापन रहाणेबाबत आता कडक भुमिका घेण्याची शक्यता दिसत आहे.

Ajinkya Rahane Rohit Sharma
IND vs NZ : कुबळेंचा जम्बो रेकॉर्ड एजाज पटेलच्या टप्प्यात

दरम्यान, बीसीसीआयने रहाणेला वगळताना दुखापतीचे दिलेल्या कारणाची नेटकऱ्यांनी चांगलीच खिल्ली उडलवी होती. आता बीसीसीआयच्या सुत्रांकडूनच रहाणेचे उपकर्णधारपद धोक्यात असल्याचे कळाल्यानंतर रहाणेला त्याच्या खराब फॉर्ममुळे संघातून बाहेर ठेण्यात आले हे स्पष्ट होते.

रोहित शर्मा न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळत नाही आहे. तो सध्या विश्रांती घेत आहे. जर रहाणेकडून उपकर्णधारपद काढून घेण्यात आले आणि रोहित शर्माकडे ते सोपवण्यात आले तर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर नवा उपकर्णधार मिळेल. रहाणेच्या जागी न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याने आपल्या पदार्पणाच्याच सामन्यात पहिल्या डावात शतकी तर दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com