India Tour of South Africa : दक्षिण आफ्रिका दौरा पुढे ढकलला; नव्या तारखा जाहीर

क्रिकेट साऊथ आफ्रिकाने भारत दौऱ्याच्या नव्या तारखा केल्या जाहीर
Team-India
Team-Indiaesakal

केप टाऊन : दक्षिण आफ्रिका (South Africa) क्रिकेट बोर्डाने सोमवारी उशिरा भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा ( India Tour of South Africa ) सुधारित कार्यक्रम जाहीर केला. यापूर्वी दक्षिण आफ्रिका दौरा ( India Tour of South Africa ) 17 डिसेंबर रोजी सुरु होणार होता मात्र आता हा दौरा 9 दिवसांनी पुढे ढकलण्यात आला आहे. नव्या कार्यक्रमानुसार भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा आता 26 डिसेंबर रोजी सुरु होणार आहे.

Team-India
कोहलीची अनोखी अन् विक्रमी 'फिफ्टी'; BCCI नं दिल्या शुभेच्छा!

नव्या तारखांनुसार भारत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ( India Tour of South Africa ) पहिली कसोटी 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर या दरम्यान खेळणार आहे. ही कसोटी चेंच्युरियन पार्कवर खेळवण्यात येईल. त्यानंतर जोन्सबर्गमध्ये 3 जानवारीला दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येईल. तर तिसरी केपटाऊन कसोटी 11 ते 15 जानेवारी दरम्यान होईल.

Team-India
Shooting champion : मराठमोळ्या राहीच्या खात्यात आणखी एक सुवर्ण!

गेल्याच आठवड्यात बीसीसीआयने आपला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ( India Tour of South Africa ) काही सुधारणा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आफ्रिका दौऱ्यातील टी 20 मालिका स्थगित करत दौरा कसोटी आणि एकदिवसीय मालिकांपुरता मर्यादित केला होता. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कोसटी मालिका ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अतर्गतच खेळली जाईल.

Team-India
IND vs NZ : कमनशिबी होण्यात एजाजने कपिल देव यांनाही टाकले मागे

भारताच्या दक्षिण आफ्रिकेच्या संपूर्ण दौऱ्याचे वेळापत्रक ( India Tour of South Africa )

26 ते 30 डिसेंबर पहिली कसोटी सुपरस्पोर्ट पार्क, सेंचुरियन

3 ते 7 जानेवारी दुसरी कसोटी, इंपिरियल वाँडर्स, जोहान्सबर्ग

11 ते 15 जानेवारी तिसरी कसोटी न्यूलँड्स, केपटाऊन

----------------------------------------------------------------------------

19 जानेवारी पहिला एकदिवसीय सामना, युरोलक्स बोलँड पार्क, पार्ली

21 जानेवारी दुसरा एकदिवसीय सामना, युरोलेक्स बोलँड पार्क, पार्ली

23 जानेवारी तिसरा एकदिवसीय सामना, सिक्स गन ग्रिल न्यूलँड्स, केप टाऊन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com