esakal | INDvsSL : हे पाच खेळाडू करु शकतात टीम इंडियात पदार्पण
sakal

बोलून बातमी शोधा

team india

INDvsSL : हे पाच खेळाडू करु शकतात टीम इंडियात पदार्पण

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारतीय संघ जुलैमध्ये मर्यादीत षटकांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. 3 वनडे आणि 3 टी -20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ नव्या रणनितीसह मैदानात उतरावे लागणार आहे. एका बाजूला इंग्लंडमधील कसोटी मालिका आणि दुसऱ्या बाजूला श्रीलंका दौरा यामुळे मर्यादीत षटकाच्या सामन्यासाठी वेगळा संघ निवडला जाईल, अशी चर्चा जोर धरत आहे. शिखर धवन या संघाचे नेतृत्व करताना दिसेल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सीनिअर टीममधील विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांच्याशिवाय नवोदितांचा भरणा असलेला संघ श्रीलंका दौऱ्यावर जाईल. युवा खेळाडूंसाठी श्रीलंका दौरा खूप महत्त्वपूर्ण असेल. आयपीएलमध्ये चमकलेल्या आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंना श्रीलंका दौऱ्यावर संधी दिली जाऊ शकते.

हेही वाचा: शास्त्री गुरुजी म्हणाले, 'बिनधास्त बॉईज'चा अभिमान!

देवदत्त पदिक्कल

आयपीएलच्या हंगामात विराट कोहलीसोबत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या डावाची सुरुवात करणाऱ्या देवदत्त पदिक्कल याला श्रीलंका दौऱ्यावर संधी मिळू शकते. युएईच्या मैदानात रंगलेल्या आयपीएल स्पर्धेत देवदत्त पदिक्कलने बंगळुरुकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. 15 सामन्यात त्याने 473 धावा केल्या होत्या. याशिवाय विजय हजारे ट्रॉफी ट्रॉफी 2020-21 (Vijay Hazare Trophy) स्पर्धेत त्याने 7 सामन्यात 147.4 च्या सरासरीने 737 धावा करुन आपल्यातील क्षमता दाखवली होती. यंदाच्या हंगामात त्याने आयपीएलमधील पहिले शतक झळखावले होते. त्याला टीम इंडियात स्थान मिळेल, असा अंदाज आहे.

राहुल तेवतिया

राहुल तेवितया मागील आयपीएल हंगामानंतर चर्चेत आला होता. तेवतियाने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या शेल्डन कॉट्रेलला एका षटकात 5 सिक्सर ठोकले होते. त्याच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने 224 धावांचे लक्ष्य पार केले होते. आक्रमक फलंदाजीशिवाय वेळप्रसंगी तो गोलंदाजीही करु शकतो. मार्चमध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची संघात निवडही झाली होती. पण प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी मिळाली नाही. श्रीलंका दौऱ्यावर तो टीम इंडियाकडून पहिला सामना खेळताना दिसू शकते.

हेही वाचा: महिला क्रिकेट जगतात अधिराज्य गाजवण्याची क्षमता असणारी शफाली

रवि बिश्नोई

20 वर्षीय लेग स्पिनर रवि बिश्नोई हा देखील श्रीलंका दौऱ्यासाठी परफेक्ट खेळाडू असेल. 2020 मध्ये झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये बिश्नोईने सर्वाधिक 17 विकेट मिळवल्या होत्या. आयपीएलमध्ये पंजाबने त्याला 2 कोटी मोजून आपल्या ताफ्यात घेतले होते. युएईच्या मैदानात त्याने 14 सामन्यात 12 विकेट आणि यंदाच्या हंगामात त्याने 4 सामन्यात 4 विकेट घेतल्या होत्या.

वरुण चक्रवर्ती

वरुण चक्रवर्ती मागील दोन वर्षांपासून चर्चेत असणारे नाव आहे. यंदाच्या आयपीएळ हंगामात त्याने 7 सामन्यात 7 विकेट घेतल्या होत्या. युएईत त्याने विशेष छाप सोडली होती. तेराव्या हंगामातील 13 सामन्यात त्याने 17 विकेट घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याला संधी मिळाली होती. पण खांद्याच्या दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलियाला जाऊ शकला नव्हता. त्यालाही श्रीलंका दौऱ्यात संधी मिळू शकते. तोही भारतीय संघात दिसू शकतो.

हर्षल पटेल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यातून आयपीएलमध्ये दमदार सुरुवात करणाऱ्या हर्षल पटेललाही श्रीलंका दौऱ्यावर संधी दिली जाऊ शकते. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या (MI) सामन्यात त्याने 27 धावा करुन 5 विकेट घेतल्या होत्या. 7 सामन्यात त्याने 17 विकेट घेतल्या होत्या. तो भारतीय संघाच्या गोलंदाजीचा अस्त्र ठरू शकतो.

loading image