WI vs IND Team India Squad : बीसीसीआयने संघ निवडताना केली चूक; विंडीज दौरा महागात पडणार?

Arshdeep Singh WI vs IND Team India Squad
Arshdeep Singh WI vs IND Team India Squadesakal

WI vs IND Team India Squad : भारत 12 जुलैपासून वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर संघ दोन कसोटी तीन वनडे आणि पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळेल. बीसीसीआयने नुकतेच भारताचा कसोटी आणि वनडे संघ जाहीर केला. कसोटी संघात बीसीसीआयने अनेक युवा खेळाडूंना संधी देत वरिष्ठांचा पत्ता कट केला आहे.

भारतीय संघातून चेतेश्वर पुजाराला डच्चू देण्यात आला आहे तर ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैसवाल यांना कसोटी संघाची दारं उघडून दिली. वनडेमध्ये संजू सॅमसन आणि उमरान मलिक यांनी संघात पुनरागमन केले आहे. बीसीसीआयने कसोटी आणि वनडे संघ निवडताना काही असे निर्णय घेतले आहेत जे आश्चर्यचकित करणारे आहेत.

Arshdeep Singh WI vs IND Team India Squad
Sanju Samson India ODI Squad : वनडे संघात संजूचे पुनरागमन मात्र Playing 11 मध्ये मिळणार का स्थान?

अर्शदीपला वनडे संघात स्थान नाही

वेस्ट इंडीज दौऱ्यावरील वनडे संघात डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून जयदेव उनाडकटची निवड करण्यात आली आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत उनाडकटची कामगिरी दमदार आहे. मात्र अर्शदीप सिंहला भारतीय वनडे संघात स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अर्शदीप हा 24 वर्षाचा आहे. त्यामुळे वेस्ट इंडीज सारख्या तुलनेने दुबळ्या संघाविरूद्ध खेळवून त्याचा आत्मविश्वास वाढवण्याची गरज होती. यामुळे वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवलात तर निवडसमितीसमोर अजून एक डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाचा पर्याय उपलब्ध झाला असता.

कुलदीप यादवलाही संधी नाही

कुलदीप यादवला बॉर्डर - गावसकर ट्रॉफीमध्ये भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले होते. मात्र वेस्ट इंडीज दौऱ्यावर रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, रविंद्र जेडजा यांना संघात जागा मिळाली आहे. हे तीनही फिरकीपटू फलंदाजी करू शकतात. मात्र भारतीय संघात एखादा तरी मनगटी फिरकीपूट असणे गरजेचे होते. अशा परिस्थितीत कुलदीप यादवची कसोटी संघात स्थान देणे गरजेचे होते.

Arshdeep Singh WI vs IND Team India Squad
Ajinkya Rahane WI vs IND : एकच फाईट वातावरण टाईट; कसोटी संघाला मिळणार मराठमोळा कर्णधार?

भारताचा कसोटी संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैसवाल, केएस भरत, इशान किशन, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी

भारताचा वनडे संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, हार्दिक पांड्या, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, कुलदीप यादव, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com