
यांगऑन (म्यानमार) : भारताच्या २० वर्षांखालील महिला फुटबॉल संघाने रविवारी (ता. १०) ऐतिहासिक कामगिरी केली. पात्रता फेरीतील अखेरच्या लढतीत म्यानमार महिला संघावर १-० असा विजय साकारत भारतीय महिला संघाने ड गटात अव्वल स्थान पटकावले आणि २० वर्षांनंतर एएफसी २० वर्षांखालील आशियाई करंडकाची मुख्य फेरी गाठली.