राजवर्धननं वय लपवलं? BCCI च्या चौकशीत दोषी आढळला तर...

rajvardhan hangargekar
rajvardhan hangargekar Sakal

Rajvardhan Hangargekar Age Fraud Controversy: भारतीय अंडर 19 वर्ल्ड कप (India U19 World Cup) विजेत्या संघाचा स्टार राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hangargekar) याच्यावर वय लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे (Maharashtra) क्रीडा आणि युवा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी यासंदर्भात बीसीसीआयला (BCCI) पत्र लिहेले आहे. 140kph वेगाने सतत गोलंदाजी करण्याची क्षमता असलेल्या गोलंदाजाची याप्रकरणात बीसीसीआयकडून चौकशी होणार असल्याचे वृत्त आहे.

वेस्ट इंडीजमध्ये (West Indies) झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत तो भारतीय संघाचा भाग होता. या स्पर्धेतील लक्षवेधी कामगिरीनंतर पार पडलेल्या आयपीएल मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) त्याच्यासाठी 1.5 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं होते. बीसीसीआय या गंभीर प्रकरणाची चौकशी करणार असून जर त्यात तो दोषी आढळला तर त्याच्यावर बंदीची कारवाई होऊ शकते. बकोरिया या IAS अधिकाऱ्याने बीसीसीआयला एक औपचारिक पत्र लिहिले असून त्यात हंगरगेकरच्या विरोधात पुराव्यांचाही समावेश असल्याचे समजते.

rajvardhan hangargekar
हिटमॅनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!

या पत्रातील उल्लेखानुसार हंगरगेकर यांचे खरे वय 21 आहे. तो तेरणा पब्लिक स्कूलचा विद्यार्थी असून आठवीच्या वर्गात प्रवेश घेत असताना, त्याची जन्मतारीख 10 जानेवारी, 2001 पासून बदलून 10 नोव्हेंबर, 2002 करण्यात आली होती. हा बदल केल्यामुळेच अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास तो पात्र ठरला होता, असा दावाही करण्यात येत आहे. BCCI ला लिहिलेल्या पत्रात बकोरिया यांनी धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राहुल गुप्ता यांनी राजवर्धन हंगरगेकर यांची जन्मतारीख बदलल्याची पुष्टी केल्याच्या स्वरूपात पुरावे पाठवले असल्याचे देखील वृत्तपत्रात लिहिले आहे.

rajvardhan hangargekar
कोहलीचा विक्रम हुकला! टी-20 चा किंग व्हायला 1 चौका पडला कमी

दिल्लीतील आदर्श नगरमधील मनज्योत कालरा याच्यावरही आधी वय लपवल्याचा आरोप झाला होता. त्याचे वय 19 वर्षांपेक्षा अधिक असून तो अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत भाग घेण्यासाठी पात्र नाही, असे बोलण्यात आले. पण हे आरोप खोटे ठरले होते. त्यानंतर मनज्योत नुसता अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी झाला नाही तर त्याने फायनलमध्ये शतकी खेळी करुन भारतीय संघाला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com